
मडगाव: विवाह सोहळा आटोपून परत जात असताना युकेतील पर्यटकांना टॅक्सीवाल्यांच्या मनमानीपणाला सामोरे जावे लागले. पेडा- वार्का येथील येथील झुरी व्हाईट सेन्ड्स रिसॉर्ट या तारांकित हॉटेलच्या गेटसमोर 17 एप्रिल रोजी सदर घटना घडली. टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीचा त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
विमानतळावर जात असताना, त्यांच्या खाजगी टॅक्सी (Taxi) अडवून ठेवण्यात आल्या. या प्रकरणाची गंभीर दखल कोलवा पोलिसांनी घेताना संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. काही संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, सध्या पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
ऑलिव्हर फर्नांडिस, ब्रिटो फर्नांडिस, रेमी रॉड्रिगीस, संजय, टुरिस्ट टॅक्सी असोसिएशन वार्काचे अध्यक्ष सेबी आणि अन्य स्थानिक टॅक्सी चालकावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संशयितांनी टॅक्सी अडविल्यानंतर 5 हजार रुपयांची खंडणीही मागितली. पोलिसांकडे हे प्रकरण पोहोचल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी, कळंगुटमधून (Calangute) अशीच एक घटना समोर आली होती. येथील एका हॉटेलमधील पर्यटक आणि गोवा माईल्सच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना अटक केली होती. कळंगुटमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधील पर्यकांनी गोवा माईल्स टॅक्सी बुक केली होती.
टॅक्सी हॉटेलजवळ पोहोचल्यावर स्थानिक टॅक्सी चालकांच्या एका गटाने टॅक्सीला हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखून अंतरावर थांबायला भाग पाडले. जेव्हा पर्यटक बुक केलेली टॅक्सी शोधायला बाहेर आले, तेव्हा तिथे उभ्या असलेल्या स्थानिक टॅक्सी चालकांनी त्यांना घेरले आणि मारहाण केली, ज्यात ते जखमी झाले आणि त्यांच्या वस्तूंचेही नुकसान झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.