Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हडफडे येथील चाकू हल्ल्याप्रकरणी आणखी चौघांना अटक

दैनिक गोमन्तक

नागवा हडफडे येथे शनिवारी पहाटे दारूच्या नशेत तरुणांच्या टोळक्याने आपल्याच मित्रावर सपासप वार करून चाकूने भोसकल्याची घटना घडली होती. यात रवी शिरोडकर (30) हा युवक जबर जखमी झाला होता. या युवकाला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी टारझन पार्सेकर या तरुणाला या प्रकरणात गजाआड केले होते. आता हणजूण पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे.

(Anjuna Police have arrested 04 more accused persons in connection with stabbing Ravi Shirodkar)

मिळालेल्या माहितीनुसार हडफडे येथे नागवा सर्कल जवळ ही घटना घडली. बाईक व्यावसायिक रवी शिरोडकर हा रात्री एका पार्टीला गेला होता. पहाटे साडे तीनच्या सुमारास याला मित्राचा फोन आला, त्यानंतर तो पुन्हा मित्रांबरोबरच बाहेर पडला. तो व त्याचे काही मित्र नागवा सर्कलजवळ उभे असताना इनोव्हा व बलेनो कारमधून आठ ते दहाजण या ठिकाणी आले. ज्यातील चार- पाच जणांनी रवीवर सुरीने हल्ला केला.

यात नागवा येथील संशयित टारझन पार्सेकर व आणखी तिघांनी रवीच्या पोटावर सुऱ्याने वार केले होते. पार्सेकर तर पोलिसांच्या ताब्यात आहे. यात आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केली. 1. शैलेश चंदू नाईक रा. कामुर्ली बार्देश गोवा, 2. सिद्धांत मांद्रेकर रा. साळगाव, 3. अमन रोहिदास शिरोडकर रा. साळगाव आणि 4. प्रशांत दासा राजू रा. नागोवा. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हल्ला पूर्वनियोजित : उदय शिरोडकर

चाकूहल्ल्यात जखमी झालेला रवी शिरोडकर हा बागा येथील श्री बाबरेश्वर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष उदय शिरोडकर यांचा चुलत भाऊ आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असून हणजूण पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करून त्यांना गजाआड करण्याची मागणी शिरोडकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

SCROLL FOR NEXT