Man arrested for theft from bike
Man arrested for theft from bikeDainik Gomantak

Panaji Police: पर्यटकांना धाक दाखवत दागिने लुटणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

बाणावली येथील तारांकित हॉटेलमधील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश
Published on

बाणावली येथील तारांकित हॉटेलमध्ये 3 मे रोजी रात्री 10 च्या दरम्यान चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी हॉटेलमधून 5.6 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम पर्यटकांना धाक दाखवत लुटले होते.

Man arrested for theft from bike
Mormugao: कायद्याचा रक्षक बनला भक्षक; महिलेच्या विनयभंगप्रकरणी PSI वर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून तामिळनाडूच्या आनंदासू चिनप्पनला पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की, हरियाणातील नवनीत शर्मा आपल्या कुटुंबासह बाणावली येथील तारांकित हॉटेलमध्ये थांबला होता, दरम्यान रात्री 10 च्या दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्या खोलीत प्रवेश केला. व चार सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम धाक दाखवत काढून घेत पळाले, अशी तक्रार शर्मा यांनी कोलवाळ पोलिस ठाण्यात दाखल केली.

Man arrested for theft from bike
Goa Corona Update: गोव्यात रविवारी 30 नवे कोरोना रूग्ण, 41 जणांना डिस्चार्ज

याचा तपास केले काही दिवस सुरु होता. या पार्श्वभूमीवर पणजी पोलिसांनी या चोरीत समावेश असणाऱ्या एकाला अटक केली. याबाबत पोलिस निरिक्षक फिलोमेना कोस्टा यांनी सांगितले की, संशयित चिनप्पनला पणजी पोलिसांनी इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. "हॉटेलच्या व्हिडिओ फुटेजवरून, तो बाणावली चोरीमध्ये ही सहभागी झाला असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com