Cash For Job Scam Canva
गोवा

'Cash For Job Scam'मुळे डागाळली गोव्याची प्रतिमा! कोटयवधींची फसवणूक; Viral Video वरुन खळबळ

Goa Crime: सरकारी नोकऱ्यांच्या विक्रीचा बाजार राज्यात सुरू असल्याचे आरोप अनेकदा विधानसभेत तसेच नोकरभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने विरोधकांकडून केले जात होते. मात्र, सरकारने ते गांभीर्याने घेतले नव्हते व या आरोपांकडे दुर्लक्ष केले जात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Government Job Scam

पणजी: सरकारी नोकऱ्यांच्या विक्रीचा बाजार राज्यात सुरू असल्याचे आरोप अनेकदा विधानसभेत तसेच नोकरभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने विरोधकांकडून केले जात होते. मात्र, सरकारने ते गांभीर्याने घेतले नव्हते व या आरोपांकडे दुर्लक्ष केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांत दाखल होणाऱ्या तक्रारींवरून आरोप सिद्ध होऊ लागल्याने सरकारने सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन देत सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

ही प्रकरणे म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत. मात्र, काहीजण लज्जेमुळे पुढे येण्यास तयार नाहीत. आतापर्यंत ९ पोलिस स्थानकांत २२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये २१ जणांना अटक झाली आहे. ही नोकरी विक्रीची प्रकरणे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी नोकरीभरती दरम्यानची आहेत. पोलिसांनी संशयितांची बँकेतील खाती गोठवण्याबरोबरच त्यांच्या मालमत्तेची माहिती जमा केली आहे.

दीपश्रीविरोधात पणजी पोलिसांत तक्रार दाखल

राज्यात सध्या गाजत असलेल्या सरकारी नोकरी विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित दीपश्री सावंत गावस हिने लेखा खात्यात अकाऊंटंटची नोकरी देण्याचे आमिष दाखवून १०.३५ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी पणजी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्देश येथील अर्जुन देसाई यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

संबंधितांवर कारवाई करावी; डॉ. स्नेहा भागवत

सरकारी नोकरी देण्यासाठी आपण ३.५ कोटी रुपये घेतले म्हणून आपल्याविरोधात पोलिस तक्रार केली असल्याची समाजमाध्यमावर बनावट पोस्ट घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी डॉ. स्नेहा भागवत यांनी केली. या अज्ञात व्यक्तीविरोधात डॉ. स्नेहा भागवत यांनी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्याकडे तक्रार दिल्यावर त्या मडगावात पत्रकारांशी बोलत होत्या.

‘आप’ची राज्यपालांकडे चौकशीची मागणी

आम आदमी पक्षाने राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे ‘कॅश फॉर जॉब’प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. नोकर भरती प्रक्रिया स्थगित करून याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी आमदार क्रुझ सिल्वा, आमदार व्हेन्झी व्हिएगस, वाल्मिकी नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. व्हेन्झी यांनी सांगितले की, या प्रकरणात भाजपचे काही नेते गुंतलेले असून ते भ्रष्टाचारात सापडल्यावर पक्षापासून दूर जात आहेत. भाजपच्या लोकांना पकडल्यावर भाजप नेते ती व्यक्ती भाजप कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट करतात. यावेळी व्हिएगस यांनी विरोधी पक्षांना एकत्र येऊन या प्रकरणाविरोधात लढण्याचे आवाहन केले आहे.

पालेकर यांनी सांगितले की, या प्रकरणात नवीन नावे आणि ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यात भाजपचे नेते या प्रकरणात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. सरकारने या प्रकरणातील सर्व संशयितांचे बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड्‌स सार्वजनिक करावेत. असे केले तर भाजपचा भ्रष्टाचार उघडकीस येईल.

श्रीपाद नाईकांसोबत पूजा; व्हिडिओने खळबळ

गोव्यात उघडकीस आलेल्या मोठ्या प्रमाणावरील नोकरी घोटाळ्याबाबत काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, हा घोटाळा राजकीय संरक्षणाखाली चालत असून, भाजपच याचा सूत्रधार आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांतर्गत न्यायालयीन समिती स्थापन करावी, अशी मागणी कवठणकर यांनी केली.

सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत नोकरी घोटाळ्यात सापडलेल्‍या पूजा नाईकचा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्‍यासोबत असलेला एक व्हिडिओ दाखविला. पूजा नाईकची ओळख भाजपच्‍या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी हा व्हिडिओ दाखविल्‍याचे कवठणकर यांनी सांगितले.

कवठणकर यांनी सांगितले की, गोव्यात नोकरी मिळवणे एक स्वप्नच बनले आहे. भाजप सरकारने राज्यातील बेरोजगारी वाढवून युवकांमध्ये निराशा निर्माण केली आणि नंतर आपणच नोकरी देण्याचे एजंट तयार करून नोकऱ्यांसाठी लोकांकडून पैसे घेतले. गोव्यात नोकरी मिळवण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT