All Goa Veterans T20 Cricket Tournament  Dainik Gomantak
गोवा

All Goa Veterans T20 Cricket Tournament: पाटणेकर वॉरियर्सवर नऊ धावांनी मात करत वास्को वॉरियर्सला विजेतेपद

All Goa Veterans T20 Cricket Tournament: अंतिम सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला

किशोर पेटकर

All Goa Veterans T20 Cricket Tournament: गोवा व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनच्या अखिल गोवा व्हेटरन्स टी-20 क्रिकेट स्पर्धेत वास्को वॉरियर्सने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पाटणेकर वॉरियर्सवर नऊ धावांनी मात केली.

स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. विजेत्या संघाला ५०,००० रुपये व करंडक, तर उपविजेत्या संघाला ३०,००० रुपये व करंडक मिळाला.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन गावस देसाई, गोवा व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद फडके, सचिव सुदेश प्रभुदेसाई यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. वास्को वॉरियर्सच्या विनोद विल्सन अंतिम सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक:

वास्को वॉरियर्स: २० षटकांत ७ बाद १६५ (दामोदर रेडकर १४, राम यादव १५, एच. करोल ३२, संदीप दलाल ४३, विनोद विल्सन २४, नवनाथ कामत ३८-२) वि. वि.

पाटणेकर वॉरियर्स: १९.४ षटकांत सर्वबाद १५६ (प्रमोद नाईक ३८, सूरज सावळ १९, मुख्तियार कादरी ६३, संजय नेत्रावळकर नाबाद ११, विनोद विल्सन २५-३, संदीप दलाल ३३-२, प्रसाद पाटील २६-४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT