Goa Bench: म्हापशातील 20 बेकायदा होर्डिंगची वीज तोडण्याचे गोवा खंडपीठाचे आदेश

पुढील आदेशापर्यंत होर्डिंग्ज कपड्याने झाकण्याचे गावच्या पंचायतींनाही आदेश
Goa Bench on Illegal Hoardings
Goa Bench on Illegal Hoardings Dainik Gomantak

Goa Bench: बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या २० होर्डिंग्जची वीज तोडावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वीज विभागाला दिले आहेत. म्हापसा वीज विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

ही होर्डिंग्ज बेकायदेशीर असून ती कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) III मध्ये येतात. मांडवी नदीकाठच्या जमिनीवर ही होर्डिंग्ज लावण्यात आलेली आहेत.

दरम्यान, खंडपीठाने ज्या जमिनीवर ही होर्डिंग्ज उभी आहेत. त्या जमिनीच्या मालकांना तसेच संबंधित कंपन्यांनादेखील ही होर्डिंग्ज कापडाने झाकावीत, असे निर्देश दिले आहेत.

Goa Bench on Illegal Hoardings
Gogoro Electric Scooters ने दिल्ली आणि गोव्यात उघडले बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क

खंडपीठाने म्हटले आहे की, “गावच्या पंचायतींनी ही होर्डिंग्ज कापडाने झाकण्यावर लक्ष ठेवावे. पुढील आदेशापर्यंत या सर्व 20 होर्डिंग्सवर होर्डिंग्ज/जाहिराती प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये.

दरम्यान, याबाबत राज्याचे महाधिवक्ता (एजी) देविदास पांगम यांनी म्हटले आहे की, सर्व होर्डिंग्ज नो-डेव्हलपमेंट झोनच्या 100 मीटरच्या आत आहेत आणि त्यानुसार गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने याबाबत निर्णय घेतला आहे की सर्व होर्डिंग्ज हटवावेत.

प्राधिकरणाने असे सादर केले की 20 पैकी कोणत्याही होर्डिंगसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही आणि ते कोस्टल रेग्युलेशन झोन अधिसूचनेचे उल्लंघन करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com