Aleixo Sequeira Goa Dainik Gomantak
गोवा

Aleixo Sequeira: अखेर सिक्वेरांनी मागितली माफी; म्हणाले, "माझा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता"

Xavier Controversy in Goa: आलेक्स सिक्वेरा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली म्हणाले कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.

गोमन्तक डिजिटल टीम

Aleixo Sequeira Statement on DNA

काही दिवसांपूर्वी सुभाष वेलिंगकर यांनी सेंट झेवियर्स यांच्या अवशेषांची चाचणी करावी अशी मागणी केली होती आणि यावरून स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात बंड पुकारण्यात आलं. सध्या राज्यात सुभाष वेलिंगकर यांना अटक व्हावी अशी जोरदार मागणी केली जातेय आणि काल ( दि. ७ ऑक्टोबर) वेलिंगकरांचा अटकेपूर्वीचा जमीन फेटाळला. हा वाद सुरु असताना पर्यटन मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि यामुळे प्रकरण आणखीन चिघळलं.

काय म्हणाले आलेक्स सिक्वेरा?

"संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये आहे. याचा पुराव म्हणजे ओल्ड गोव्यात त्यांच्या दर्शनासाठी येणारी लोकांची संख्या. जर लोकांचा त्यांच्यावर विश्वास नसता तर एवढे लोक त्यांच्या दर्शनासाठी आलेच नसते. " असं म्हणत आलेक्स सिक्वेरा यांनी चर्चांना उधाण आणलं.

गोव्यातील भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या विधानाचा निषेध करत 'वादग्रस्त विधान करण्याचा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना अधिकार नाही' असे वक्तव्य केले. हिंदूंबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार सिक्वेरा यांना नाही. आपण सर्वधर्म समभावाने विचार करत सर्वांचा सामान आदर केला पाहिजे. राज्यात एक वाद सुरु असताना त्याला खतपाणी घालू नये, असं ते म्हणाले.

गिरीराज पै वेर्णेकर यांच्या वक्तव्यानंतर आलेक्स सिक्वेरा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली आहे. आपला हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता असेही ते म्हणालेत. राज्यात शांतता, सर्वधर्म समभाव आणि बांधिलकी असावी अशी त्यांची इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang Rivalry: गोव्यात खाकीचा दरारा संपला? गँगवॉर आणि वाढती गुंडगिरी चिंताजनक

Goa Live News: साखळी मतदारसंघात काँग्रेसमध्ये फूट?

Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

SCROLL FOR NEXT