Vijai sardesai
Vijai sardesaiDainik Gomantak

Goa Politics: 'काँग्रेसने आळस झटकून कामाला लागावे'! सरदेसाईंचा सल्ला; कार्निव्हलमध्ये दिली विजयाची खात्री

Vijai sardesai: गोव्यात येणारे आगामी सरकार काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचेच असेल याची लोकांनी खात्री बाळगावी, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
Published on

मडगाव: गोव्याचे भवितव्य घडवायचे की तोडायचे हे याच वर्षी ठरणार आहे. त्यामुळे महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आपला सर्व आळस झटकून कामाला लागावे, असा सल्ला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला. गोव्यात येणारे आगामी सरकार काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचेच असेल याची लोकांनी खात्री बाळगावी, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

कार्निव्हलनिमित्त सरदेसाई यांच्या वुई फॉर फातोर्डा या संघटनेतर्फे ''कार्निव्हल बिग फॅट'' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक तसेच युकेचे माजी मंत्री आणि माजी खासदार किथ वाझ हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

Vijai sardesai
"आता वेळ आलीय!" गोमंतकीयांच्या दुहेरी नागरिकत्वासाठी विजय सरदेसाईंची दिल्ली दरबारी सर्वात मोठी मागणी; काय म्हणाले?

पाटकर म्हणाले, सध्या कार्निव्हल चालू आहे. सध्या ‘लोक खा, प्या आणि मजा करा’ या मूडमध्ये आहेत. कित्येक गोमंतकीयांनी यापूर्वीच पोर्तुगीज नागरिकत्व घेतले आहे.

Vijai sardesai
Vijai Sardesai: 'मी मुख्यमंत्री झालो तर...', विजय सरदेसाईंनी केलं मोठं वक्तव्य, निवडणुकीत कोणता मुद्दा असावा हेही सांगितलं

अशा नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाचा फायदा मिळावा यासाठी केंद्राने ''मदर ऑफ ऑल डिल्स '' खाली प्रयत्न करावेत अशी मागणी विजय सरदेसाई यांनी कालच्या कार्यक्रमात केली. यासाठी आंतिनीयो कॉस्ता यांच्याशी संपर्क साधावा, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com