Goa Street Race: 'पुढील 3 वर्षे गोवा स्ट्रीट रेस होत राहील'! CM सावंतांचे प्रतिपादन; पर्यटनाला चालना मिळण्याचा केला दावा

Goa Street Race Mopa: : मोपा येथे गोवा स्ट्रीट रेस (फॉर्म्युला-४) या कार रेसिंग स्पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. पुढील तीन वर्षे ही स्‍पर्धा मोपावर होत राहील.
Goa Street Race Mopa
Goa Street Race MopaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मोपा येथे गोवा स्ट्रीट रेस (फॉर्म्युला-४) या कार रेसिंग स्पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. पुढील तीन वर्षे ही स्‍पर्धा मोपावर होत राहील. त्‍यामुळे क्रीडा पर्यटनाची इको सिस्‍टम तयार होईल, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

स्‍पर्धा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्‍हणाले, की पुढील तीन वर्षे ‘फॉर्म्युला-४’चे ‘जीएमआर’च्‍या सहयोगाने आयोजन होईल. त्‍यासाठी निर्माण करण्‍यात आलेल्‍या साधनसुविधांचा नक्‍कीच उपयोग होईल. ही स्‍पर्धा क्रीडा पर्यटनाला चालना देईल. त्‍यामुळे हॉटेल, वाहनांना काम मिळेल.

भविष्‍यात देशाला फॉर्म्युला-१ची संधी मिळाली, तर गोवा यजमानपदासाठी नक्‍कीच प्रयत्‍न करेल, असेही ते म्‍हणाले. ‘फॉर्म्युला-४’ स्पर्धेमध्‍ये काही गोमंतकीयांचाही प्रत्‍यक्ष सहभाग होता. आमदार ज्‍योशुआ डिसोझा हेही कार रेससाठी अत्यंत उत्‍सुक असतात. त्‍यांचाही यात सहभाग होता, असे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले.

Goa Street Race Mopa
Goa Street Race: ‘गोवा स्ट्रीट रेस’मध्ये 3 अपघात! नियोजनात त्रुटी; विदेशी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा आनंद

१. जुने गोवे: येथील गोवेश्वर महाशिव मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सकाळी आगमन झाले. त्यांनी मंदिरासह सर्व परिसर न्याहाळला. महाशिव मंदिराच्या उभारणीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये भाग घेतला. या मंदिरामध्ये पाषाणातील कोरीव कलाकृती आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंदिरातील सहा फूट उंचीच्या पिंडीचे पूजन केले. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण झाले. कलशारोहणावेळी मंदिरावर ध्वजारोहणही करण्यात आले.

२.या मंदिरासाठी चुनार दगडाचा वापर करण्यात आला आहे. बांधकामात कुठेही लोखंड वापरलेले नाही. येथे बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा आनंद येथे मिळणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa Street Race Mopa
F4 Indian Championship Racing: मोपा येथे शनिवारपासून 'फॉर्म्युला फोर' रेस; CM प्रमोद सावंतांनी रेसिंग ट्रॅक, कारची केली पाहणी

गवताला आग लागल्याने गोंधळ

१. दुपारी रेस ट्रॅकनजीकच्या गवताला अचानक आग लागल्‍यामुळे धुराचे लोट उठले होते. त्‍यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

२. ‘गोवा एसेस जेए रेसिंग’चे जॉन अब्राहम, किच्चास किंग्स बंगळुरूचे किच्चा सुदीप, हैदराबाद ब्लॅक बर्डसचे नागा चैतन्य आणि कोलकाता रॉयल टायगर्सचे सौरव गांगुली हे संघमालक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com