Arambol: 'परप्रांतीय घरात घुसले आणि... '! दलाल, बेकायदा गोष्टींमुळे हरमलवासीय संतप्त; कायदा हातात घेण्याचा दिला इशारा

Arambol Woman Trafficking: मांद्रे पोलिस स्थानकात निवेदन दिल्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकारांना ही माहिती दिली. येथील बेकायदा वेश्‍या व्यवसायाविषयी पोलिसांना डिसेंबर महिन्यात लेखी तक्रार दिली होती.
Arambol Woman Trafficking
Arambol Woman TraffickingDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: येथील खालचावाडा भागात वेश्या तसेच या व्यवसायातील दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यांची नावे पोलिस महानिरीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांना दिल्यास दोन महिने उलटले. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत यावर कारवाई न झाल्यास थेट कायदा हाती घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मांद्रे पोलिस स्थानकात निवेदन दिल्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकारांना ही माहिती दिली. येथील बेकायदा वेश्‍या व्यवसायाविषयी पोलिसांना डिसेंबर महिन्यात लेखी तक्रार दिली होती. येथे फसवणूक करून आणलेल्या महिलांनी तक्रार दिली होती तसेच दलालांची नावेही दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

शनिवारी (ता. १४) काही परप्रांतीय स्थानिकांच्या घरात शिरून मुलींची मागणी करू लागल्याने ग्रामस्थ संतापले. लोकांनी त्या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. असे प्रकार नियमित घडत असल्याने सरकारने तातडीने कारवाई करणे आवश्‍यक आहे, असे माजी सरपंच इनासिओ डिसोझा यांनी सांगितले.

येत्या आठ दिवसांत कारवाई न केल्यास ग्रामस्थ कायदा हातात घेतील आणि त्याला सरकार पूर्णत: जबाबदार असेल, असे पीटर कार्दोज यांनी सांगितले. तसेच ‘एस्कॉर्ट साईट’ही त्वरित बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली. हरमल भागात सध्या महिलांना सुरक्षित वातावरण नाही. संध्याकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे या भागात पोलिस गस्त वाढवा, अशी मागणी क्लाऊड फर्नांडिस यांनी केली. वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आम्ही अनेकदा पोलिसांना सांगितले. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही. हा व्यवसाय पूर्णत: बंद करा, असे जॉकी रॉड्रिग्स यांनी सांगितले.

Arambol Woman Trafficking
Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

गैरप्रकारांना खुलेआम सरकारी कर्मचाऱ्यांचे पाठबळ?

आज ९० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन साहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद फटनाईक यांना सादर करण्यात आले.

काही सरकारी कर्मचारी, वरिष्ठांच्या वरदहस्ताने वेश्याव्यवसायास पाठबळ मिळत आहे.

हा व्यवसाय समूळ नष्ट करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

Arambol Woman Trafficking
Arambol: 'जमीन रूपांतरास आपला पूर्ण विरोध'! आमदार आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलवासीयांसोबत राहणार असल्याचा केला दावा

या निवेदनाच्या प्रती पोलिस महानिरीक्षक, पेडणे पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक तसेच स्थानिक पंचायतीला दिल्या आहेत.

काहीजणांनी ‘आरंबोल एस्कॉर्ट साईट’ सुरू केली असून त्याद्वारे पर्यटकांना आकृष्ट केले जाते.

वेश्या व्यवसायामुळे येथील चांगल्या दर्जाची गेस्ट हाऊस, हॉटेल्सची बदनामी होत असल्याचे डिसोझा यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com