Smriti Irani  Dainik Gomantak
गोवा

Smriti Irani : 'सिली सोल्स'वर जाहीर चर्चा करा!

सत्य कळू द्या : केंद्रीय मंत्री इराणी यांना आयरिश रॉड्रिग्स यांचे आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी : आसगाव येथील कथित ‘सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार’ प्रकरणावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सार्वजनिकरित्या चर्चा करण्यासाठी पुढे यावे, असे रोखठोक आव्हान सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी केले आहे. अशी जाहीर चर्चा केल्याशिवाय गोव्यातल्या आणि देशभरातील लोकांना सत्य कळणार नाही, असेही रॉड्रिग्स यांचे मत आहे.

याबाबत रॉड्रिग्स म्हणाले, ‘सिली सोल्स’ची जागा आणि परवाने स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असल्याचा दावा कोणीही केलेला नाही. मात्र, हे हॉटेल ज्या कंपनीकडून चालवले जाते, त्या एइटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजिस कंपनीचे संचालक इराणी यांचे पती आणि मुलगा हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीचा पत्ता सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार या पत्त्यावरच आहे. याशिवाय याच कंपनीचा जीएसटीसाठीचा पत्ताही तोच आहे, यावरून प्रथमदर्शनी हे हॉटेल इराणी यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून चालवले जाते, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते.

फूड ब्लॉगर विजयकर चर्चेत

फूड ब्लॉगर कुणाल विजयकर यांनी इराणी यांची मुलगी झोईश हिची खास मुलाखत घेतली असून त्यात झोईश गोव्यात हे आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट चालवत असल्याचे म्हटले आहे. आणि झोईश हिनेही ते मान्य केले आहे. त्यामुळे ही मुलाखत आणि विजयकर सध्या बरेच चर्चेत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. यावरूनही हे रेस्टॉरंट इराणी कुटुंबीयांकडून चालवले जाते, हे स्पष्ट आहे, असे रॉड्रिग्स यांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT