Agriculture policy Gomantak Digital Team
गोवा

Agriculture Policy: मसुदा तयार ; पण कृषी धोरण रखडले !

मंत्री रवी नाईक : समिती चेअरमनच्या राजीनाम्यामुळे झाला विलंब, सध्या छाननी सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्याचे कृषी धोरण रखडले असून यापूर्वीच्या समितीच्या चेअरमनने राजीनामा दिल्याने विलंब होत आहे. त्यामुळे समिती नव्याने धोरणाचा मसुदा तयार करीत असल्याचे लेखी उत्तर कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कृषी धोरणाची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या कोणत्या उत्पादनाला राज्य सरकार आधारभूत किंमत देते, 2019 पासून शेतकऱ्यांची भरपाई देणे राहण्याचे कारण आणि कितीजण भरपाईपासून वंचित आहेत याचा तपशील अशी माहिती मागितली होती. त्यानुसार कृषी मंत्री रवी नाईक यांनी म्हटले आहे की, राज्याच्या कृषी धोरणाचा मसुदा तयार आहे. यापूर्वीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यामुळे समितीकडे मसुदा छाननी करण्यासाठी तथा पुनर्रचनासाठी आहे.

याशिवाय राज्यात जी शेतीउत्पादने होतात त्यांना मिळणाऱ्या आधारभूत किंमती अशा आहेत. त्यामध्ये नारळाला प्रति नग 12 रुपये, काजू प्रति किलो 125 रुपये, सुपारी प्रति किलो 170 रुपये, भात प्रति किलो 20 रुपये, हळसाणे प्रति किलो 100 रुपये, ऑईल पाम प्रति टन 9 हजार रुपये, ऊस प्रति टन 3 हजार रुपये. त्याचबरोबर आदिवासी समुदायास पारंपरिक सेंद्रीय शेती करण्यास विशेष जागा देण्याचे कृषी खात्याने काही नियोजन केले नसल्याचेही उत्तर देण्यात आले आहे. मोठ्या स्वरूपाचे शीतगृह सुविधा देण्याचेही काही सरकारचे धोरण नसल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.

भरपाईच्या प्रतीक्षेत पेडण्यातील शेतकरी सर्वाधिक

शेतकऱ्यांना 2019 पासून नुकसान भरपाई देणे बाकी आहे, त्यात क्षेत्रीय कार्यालयाकडील माहिती अशी ः पेडणे तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. 2019-20 मध्ये या तालुक्यातील 10 जण, 2020-21 मध्ये 42 ,2021-22 मध्ये 6 जणांचे देणे बाकी आहे. त्यात काही शेतकऱ्यांच्याविषयी तक्रारी आहेत, तर काहीजण अपात्र ठरलेले आहेत. २०२२-२३ मध्ये कोणत्या शेतकऱ्याचे देणे बाकी नाही.

डिचोली तालुक्यातील 2019-22 पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचे देणे बाकी नाही. तसेच २०२२-२३ (फेब्रुवारीपर्यंत) 7 जणांचे अर्ज आले होते, त्यापैकी पाच मंजूर झाले आहेत, तर दोन अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. २०२२-२३ (फेब्रुवारीपर्यंत) दोन अर्ज आले आहेत. म्हापसा क्षेत्रीय कार्याक्षेतातून 2019 ते 2022 पर्यंत कोणीही शिल्लक नाही. 2022-23 (फेब्रुवारीपर्यंत) 8 अर्ज आले आहेत.

साखळी, मडगाव, काणकोणातून एकही अर्ज नाही

1. साखळी क्षेत्रात2019-22 पर्यंत कोणीही नाही. 2022-23 (फेब्रुवारीपर्यंत)4 अर्ज आले आहेत. काणकोण तालुक्यात 2019-23 (फेब्रुवारीपर्यंत) एकही अर्ज नाही. मडगाव क्षेत्रातून 2019-22 पर्यंत एकही नाही. 2022-23 (फेब्रुवारीपर्यंत) तीन अर्ज आले आहेत.

2.फोंडा क्षेत्रात2019-22 पर्यंत कोणीही शिल्लक नाही,2022-23 (फेब्रुवारीपर्यंत) 9 अर्ज दाखल आहेत. सांगे क्षेत्रात 2019-22पर्यंत कोणीही शिल्लक नाही,2022-23 (फेब्रुवारीपर्यंत)9 अर्ज दाखल आहेत. फोंडा क्षेत्रात 2019-22 पर्यंत कोणीही शिल्लक नाही, 2022-23 (फेब्रुवारीपर्यंत) 23 अर्ज दाखल आहेत.

3. धारबांदोडा क्षेत्रात 2019-22 पर्यंत कोणीही शिल्लक नाही, 2022-13 (फेब्रुवारीपर्यंत) 36 अर्ज दाखल आहेत. वाळपई क्षेत्रात 2019-21 पर्यंत कोणीही शिल्लक नाही 2021-22 मध्ये 3 अर्ज आले आहेत, तर2022-23 (फेब्रुवारीपर्यंत) 10 अर्ज दाखल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT