Shri Vidhya
Shri VidhyaGomantak Digital Team

Panaji News : भाजपसमोर लोटांगण घालून संघाने आपली प्रतिष्ठा गमावली

रविवारी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘लोटांगट’ या वेलिंगकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रा. माधव कामत यांनी प्रकाशन केले.
Published on

पणजी : प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे लेखन इतिहास लेखनाच्या परंपरेतील शंभर नंबरी सोने आहे, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य माधवराव कामत यांनी येथे केले व प्रा. वेलिंगकर यांनी भाषा आंदोलन व संघातील फूट यावर लिहिलेले ‘लोटांगण’ हे पुस्तक विश्वासार्ह आहे, त्याचा नव्या पिढीने अभ्यास करून सत्य समजून घ्यावे, असे आवाहन केले. तर संघाने आतापर्यंत गोव्यात कमावलेली प्रतिष्ठा भाजपसमोर लोटांगण घालून गमावली, अशा शब्‍दांत प्रा. वेलिंगकर यांनी घणाघात केला.

रविवारी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘लोटांगट’ या वेलिंगकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रा. माधव कामत यांनी प्रकाशन केले, त्यावेळी प्राचार्य कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीविद्या प्रतिष्ठाने संचालक नितीन फळदेसाई, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ व लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर उपस्थित होते.

अन्याय आणि अपप्रचाराला तोंड देऊन सत्यस्थिती मांडण्यासाठी प्रा. वेलिंगकर यांनी पुस्तक लिहिले आहे, त्यात निष्ठेसाठी स्वकीयांशीच सतत कसा लढा दिला त्याचे वर्णन आहे, असे गुरुदास सावळ यांनी सांगितले. संघाच्या सर्व सरसंघचालकांनी घालून दिलेली नितीमुल्यांची चौकट नष्ट करण्याचे प्रयत्न गोव्यात झाल्याने आपण ती भ्रष्ट यंत्रणा सोडली. संघाचे विचार सोडलेले नाहीत. मातृभाषांच्या धोरणाला तत्कालीन पर्रीकर सरकारने तिलांजली देऊन घुमजाव केल्याने आंदोलन राज्यभर पसरले.

प्रा. सुभाष वेलिंगकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com