Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

Gujarat ATS Foils Major Terror Plot: गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रविवारी (9 नोव्हेंबर) मोठी कारवाई केली. अहमदाबाद येथे एका मोठ्या दहशतवादी कटाच्या आरोपाखाली तिघांच्या मुसक्या आवळल्या.
Three Suspects Arrested
Three Suspects ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat ATS Foils Major Terror Plot: गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रविवारी (9 नोव्हेंबर) मोठी कारवाई केली. अहमदाबाद येथे एका मोठ्या दहशतवादी कटाच्या आरोपाखाली तिघांच्या मुसक्या आवळल्या. हे तिघेही गेल्या वर्षभरापासून एटीएसच्या रडारवर होते. या अटकेमुळे देशातील विविध भागांत घातपात घडवण्याचा मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले.

गुजरात एटीएसची मोठी कारवाई आणि जप्त शस्त्रसाठा

गुजरात एटीएसने जारी केलेल्या निवेदनानुसार, अटक करण्यात आलेल्या तिघांना शस्त्रे पुरवताना ताब्यात घेण्यात आले. हे आरोपी देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद (वडील: अब्दुल खादर जिलानी), मोहम्मद सुहेल (वडील: मोहम्मद सुलेमान) आणि आझाद (वडील: सुलेमान सैफी) यांचा समावेश आहे. यापैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशचे, तर तिसरा आरोपी आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपींकडून दोन ग्लॉक पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, 30 जिवंत काडतुसे आणि 4 लीटर एरंडेल तेल जप्त करण्यात आले आहे. एटीएस आता या आरोपींच्या नेटवर्कची आणि हल्ल्याच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सखोल चौकशी करत आहे.

गुप्तचर यंत्रणेची चेतावणी

दरम्यान, भारतीय सुरक्षा दलांनी पहलगाम येथे 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीरित्या राबवून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, गुप्तचर यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रिय होत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) हे दहशतवादी गट केंद्रशासित प्रदेशात समन्वित हल्ल्यांची एक मालिका सुरु करण्याची योजना आखत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्विसेज इंटेलिजेंस आणि त्यांचा उच्चभ्रू स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (SSG) दहशतवाद्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी सक्रियपणे मदत करत आहे, ज्यामुळे बंडखोरीचे नेटवर्क पुन्हा जिवंत करण्याचा सुनियोजित प्रयत्न समोर येत आहे.

Three Suspects Arrested
Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

दुसरीकडे, गुप्तचर संस्थांनी सप्टेंबर महिन्यापासून घुसखोरीच्या मार्गांवर ड्रोनच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले. लष्कर-ए-तैयबाच्या 'शमशेर' नावाच्या कुप्रसिद्ध ऑपरेटरच्या युनिटद्वारे हे ड्रोन हवाई टेहळणी करत आहेत. आत्मघाती हल्लेखोरांना उतरवण्यासाठी किंवा हवाई हल्ले करण्यासाठी संभाव्य जागा शोधल्या जात असाव्यात, असा अंदाज आहे.

Three Suspects Arrested
Gujarat Lion: ‘तुम्ही गोव्याहून गुजरातमध्ये सिंहांचा अभ्यास करण्यासाठी, इतक्या दूर का आलात?' सौराष्ट्रातील विस्थापित सिंह

याचबरोबर, पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीम (BAT) च्या हालचाली पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये पुन्हा वाढू लागल्या आहेत. 'बॅट' पथकात प्रशिक्षित दहशतवादी आणि निवृत्त एसएसजी कमांडो यांचा समावेश असतो. सुरक्षा अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली की, ही पुनर्नियुक्ती पुढील महिन्यांमध्ये अचानक घुसखोरीचे प्रयत्न किंवा सीमापार हल्ले वाढण्याचे संकेत देत आहे. एकूणच, गुजरात एटीएसने दहशतवादी कट उधळला असला तरी, जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागावर आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना आगामी काळात मोठा धोका आणि आव्हान पेलावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com