मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

Goa fish market crisis: दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (SGPDA) कोणतीही सुधारणा कामे केलेली दिसत नाहीत

मडगाव येथील किरकोळ मासेविक्री बाजाराची दुरवस्था अजूनही कायम असून, दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (SGPDA) कोणतीही सुधारणा कामे केलेली दिसत नाहीत. मासेविक्रेत्यांनी वारंवार केलेल्या सुविधांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल SGPDA अध्यक्षांना जबाबदार धरले आहे. दरम्यान, समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे नौका बंदरावर उभ्या असल्याने माशांचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. तसेच, कामगार त्यांच्या गावी परतल्यामुळे मजूर टंचाई जाणवत आहे, ज्यामुळे बांगडा, सार्दीणसारख्या माशांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, तर सुरमई (किंगफिश) मासा १००० प्रति किलो दराने विकला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com