

कोकणात सध्या एका हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘ओंकार’ नावाच्या या हत्तीने काही दिवसांपासून ग्रामीण भागात उच्छाद मांडला असून स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच या हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ओंकार हत्तीची शेतात अचानक एन्ट्री होते. अचानक आलेल्या हत्तीच्या हल्ल्यामुळे म्हशींनी जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळ काढला आणि ही दृश्यं पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले.
स्थानिकांनी सांगितले की, ओंकार हत्ती गेल्या काही दिवसांपासून गावोगाव फिरताना दिसत आहे. काही ठिकाणी त्याने शेतातील केळी, भात आणि इतर पिकांचं नुकसान केल्याचंही सांगितलं जातं. वनविभागाच्या पथकाने या हत्तीला पकडण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र तो अत्यंत चपळ असल्याने तो एका गावातून दुसऱ्या गावात सहजपणे हालचाल करतो, त्यामुळे ही मोहीम आव्हानात्मक ठरत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, ओंकार अचानक एका वळणावरून बाहेर येतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या म्हशींच्या कळपाकडे धाव घेतो. म्हशी घाबरून वेगाने पळत सुटतात आणि काही क्षणातच सगळं दृश्य गायब होतं. या व्हिडिओला सोशल मीडियावर हजारो व्ह्यूज मिळालेत.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, हत्तीच्या हालचालींची माहिती मिळाल्यास त्वरित अधिकाऱ्यांना कळवावी आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.
कोकणात यापूर्वीही हत्तींच्या हालचालींमुळे अनेकदा लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र ‘ओंकार’ हत्तीचा सध्याचा धुमाकूळ आणि त्याचे व्हायरल व्हिडिओ पाहता, कोकणातील नागरिक पुन्हा एकदा सावध झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.