Aditya Thackeray On Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

"दिवसाला दोन-दोन हजार किलोमीटर रस्ते बांधणारे, Goa-Mumbai Highway अजून पूर्ण करू शकले नाहीत"

Aditya Thackeray: हे दोन्ही रस्ते हस्तांतरित झाल्याने टोलनाके आणि होर्डिंग्जमधून मिळणारा पैसाही महापालिकेकडे जायला हवा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Ashutosh Masgaunde

Aditya Thackeray On Mumbai-Goa Highway:

माजी मंत्री आणि शेवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील रास्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरही भाष्य केले.

देशात एका दिवसात दोन दोन हजार किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत. पण मुंबई-गोवा महामार्ग 7-8 वर्षे झाली तरी पूर्ण झाला नाही. अशी टिप्पणी अदित्य ठाकरे यांनी केली.

मागच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेसवे एमएमआरडीए (MMRDA) ने मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केले. या रस्त्यांची देखभाल आता महापालिकेच्या खर्चातून केली जात आहे.

मुंबईकरांच्या पैशातून हे दोन्ही रस्ते सांभाळले जात असतील, तर टोलनाके अजूनही का आहेत? तो पैसा एमएसआरडीसीकडे जातो का? या दोन्ही रस्त्यांवरील होर्डिंगचे पैसे एमएसआरडीसीकडे का जात आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हे दोन्ही रस्ते हस्तांतरित झाल्याने टोलनाके आणि होर्डिंग्जमधून मिळणारा पैसाही मुंबई महापालिकेकडे जायला हवा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

माझ्या माहितीप्रमाणे MSRDC अजूनही या रस्त्यांवर टोल वसूल करत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुंबईकरांचा पैसा वापरला जात आहे. मग मुंबईकरांवर दुहेरी जबाबदारी, दुहेरी कर का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबई-गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण का?

देशात सर्वाधिक कर मुंबईकर भरत असतानाही मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. देशात आज एका दिवसात दोन दोन हजार किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत.

मात्र, मुंबई-गोवा महामार्ग सात-आठ वर्षांत पूर्ण होऊ शकला नाही. तसेच मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गावरही चंद्रासारखे मोठे खड्डे पडले आहेत. तेथे दुरुस्ती होत नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करणे गरजेचे होते. पण दिल्लीस्वारांचे वारे वाहत आहेत, त्यामुळे त्यांना वेळ नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

मी मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाला पत्र पाठवून दोन मागण्या केल्या आहेत. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेसाठी मुंबईकर टॅक्स भरत आहेत, हे मान्य असेल, तर टोलनाके तातडीने रद्द करावेत. त्यांनी घटनाबाह्य सरकारशी बोलून सरकारच्या ठेकेदार मित्रांशी बोलून तोडगा काढावा, वन टाइम सेटलमेंट करून हे टोलनाके बंद करावेत. या रस्त्यांवर लावल्या जाणाऱ्या होर्डिंग्जचा संपूर्ण महसूल मुंबई महापालिकेकडे यायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT