Goa Borim Bridge: 37 वर्षे जुना बोरी पूल धोकादायक; पर्यायी पूल उभारण्याची पंचायतीची मागणी

सरपंच दुमिंग वाझ: झुवारी नदीवर पर्यायी नवा पूल हवा
Goa Borim Bridge
Goa Borim BridgeDainik Gomantak

Goa Borim Bridge बोरीच्या पुलाचे आयुष्यमान संपलेले असून पुलावरून होणारी अवजड वाहनाची बेसुमार वाहतूक पाहता हा पूल आता हे वजन पेलण्यास समर्थ नाही. या पुलाला धोका पोचण्याअगोदर या पुलाला पर्यायी पूल उभारला जावा, म्हणून रस्ता विभागाला पंचायतीतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.

या पुलाची सद्यपरिस्थिती पाहता पुलाला धोका संभवतो. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच नवा पूल बांधण्यासाठी गोवा आणि केंद्र सरकारने प्रयत्न करावे, असे मत बोरीचे सरपंच दुमिंग वाझ यांनी सांगितले.

दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या झुवारी नदीवरील बोरी पुलाला ३७ वर्षे पूर्ण झाली. सुमारे ३ कोटी रुपयांत बांधलेल्या या पुलाची पाचवर्षामागे पावणे अकरा कोटी रु. खर्चून दुरुस्ती करण्यात आली.

ती दुरुस्ती व्यवस्थित न झाल्यामुळे ३० ऑक्टोबर २०१९ च्या दरम्यान सुमारे १० लाख रु. खर्चून फेरदुरुस्ती केली गेली. कोणत्याही पुलाचे आयुष्य हे ३० वर्षाचे असते. हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे, असे मत समाजकार्यकर्ते विश्‍वंभर देवारी यांनी व्यक्त केले.

Goa Borim Bridge
Monsoon Season In Goa: पर्यटकांसह ट्रेकर्ससाठी गुडन्यूज ! लवकरच पावसाळ्यातही दूधसागरवर ट्रेकिंग करता येणार

पुलाच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, ते अधूनमधून दुरुस्तही केले जातात. पर्यायी पूल उभारण्यासाठी पावले उचलणं गरजेचे आहे. मध्यंतरी या नदीवर पर्यायी पूल उभारण्यासाठी तामशिरे-बोरी ते लोटली या जलमार्गाचे तसेच भूमीचे सर्वेक्षणही केले गेले.

परंतु या कामाला अद्याप गती आली नाही. बोरीच्या या कमकुवत पुलाला धोका पोचण्यापूर्वीच शासनाने पावले उचलणे, ही काळाची गरज आहे.

पुलाला बार्जची धडक!

झुवारी नदीच्या पात्रातून खनिजमाल नेण्यासाठी अनेक बार्जची ये-जा चालू असते. एका रात्री एका बार्जने या पुलाच्या खांबावर रात्रीच्या अंधारात जोरदार धडक दिल्यामुळे पुलाचा खांब मोडून एका बार्जवर पुलाचे अवशेष पडले होते.

या बार्जच्या मालकाने नामी शक्कल लढवून पोलिसात तक्रार नोंदवली, हे प्रकरण लवादात गेले. आपल्या मालकीची बार्ज जात असताना पुलाचा खांब मोडून बार्जवर पडला, आपले हजारो रु.चे नुकसान झाले.

Goa Borim Bridge
Chapora Jetty: मच्छीमारांची आधारस्तंभ असलेली जेटी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; दुर्घटना घडण्याच्या शक्यतेने भीतीचे वातावरण

ते भरून द्यावेत अशी मागणी केली. कोर्टात हा बाजमालक केस जिंकून शासनाकडून त्यांनी बार्जची नुकसान भरपाई मिळवून घेतली. त्यानंतर पुन्हा शासनाने पुलाच्या खाबांची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली.

त्यानंतर अधूनमधून या पुलाच्या खांबांना बार्जचे धक्के बसून पुलाचे खांब निकामी बनले गेले. पुल कमकुवत बनत चालल्याने गोवा शासनाने या पुलापासून काही अंतरावर सुमारे ३ कोटी रु. खर्चाची योजना आखून नवा पुल उभारला व या पुलाचे २७ ऑगस्ट १९८६ लोकार्पण झाले.

Goa Borim Bridge
Fatorda Stadium: ट्रॅकला भेगा, क्रिकेटची खेळपट्टी, फुटबॉलची जाळी खराब; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेअगोदर विदारक चित्र समोर

तरंगता पूलही उभारला होता...

झुवारी नदीवर पोर्तुगीज काळात बोरी येथे पोर्तुगिजांनी पहिला पुल उभारला होता. हा पुल राज्याबरोबरच शेजारच्या राज्यात प्रसिध्द होता. बोरी आणि लोटली बाजूने जोड रस्ता बांधतेवेळी बैलगाडीतून माती आणून भराव घालण्यात आला होता, असे वयोवृद्ध लोक अजूनही सांगतात.

गोवा मुक्ती संग्रामावेळी पोर्तुगिजांनी गोव्यातून पलायन करताना दक्षिण आणि उत्तर गोव्याचा संपर्क तोडण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणून हा पुल उडवून दिला होता व पुलावरून होणारी वाहतूक बंद पाडली होती.

गोवा मुक्तीनंतर लष्कराने या कोसळलेल्या पुलाला जोडणारा तरंगता पुल बांधून लोकांची वाहतुकीची व्यवस्था करून दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com