Fatorda Stadium: ट्रॅकला भेगा, क्रिकेटची खेळपट्टी, फुटबॉलची जाळी खराब; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेअगोदर विदारक चित्र समोर

पथदीपांची गैरसोय : फुटबॉल गोल पोस्टसाठी उभारलेली जाळी फाटली
Fatorda Stadium
Fatorda StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

Fatorda Stadium राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरणार आहेत, त्यासाठी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियम हे प्रमुख केंद्र असणार आहे. मात्र येथील साधन सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

नेहरू स्टेडियमबाहेर जो चालण्यासाठी ट्रॅक आहे तो खराब झालेला आहे. तसेच सरावासाठी असलेले एस्ट्रो टर्फ मैदानही खराब झाले आहे. येथे सायंकाळच्या वेळी पथदीप पेटत नाहीत. येथील जलतरण तलावाचे काम अर्धवट आहे.

शिवाय मध्यभागी असलेल्या क्रिकेट मैदानावरील खेळपट्टी खराब झाली आहे. निगा राखायला तिथे कुणीही नाही. त्या खेळपट्टीसभोवताली दोरीने कुंपण घातलेले असले तरी रविवारी व सुट्टीच्या दिवसांत मुले तसेच काही वयस्क माणसे देखील तिथे येऊन खेळताना दिसतात.

Fatorda Stadium
Monsoon Season In Goa: पर्यटकांसह ट्रेकर्ससाठी गुडन्यूज ! लवकरच पावसाळ्यातही दूधसागरवर ट्रेकिंग करता येणार

त्यामुळे येथील खेळपट्टीला धोका संभवतो. सध्या पावसामुळे क्रिकेट हंगाम जरी बंद असला तरी या खेळपट्टीची निगा राखली नाही तर आगामी मोसमात खेळपट्टी नव्याने तयार करावी लागणार आहे.

या प्रकाराबाबत क्रीडाप्रेमी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. एस्ट्रो टर्फ मैदानावर खेलो इंडिया केंद्र आहे. तिथे फुटबॉल वगैरे खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याबाबत एका नागरिकाने सांगितले की, आपण दररोज इथे ट्रॅकवर चालण्यासाठी येतो.

सध्या पथदीप पेटत नसल्याने लोकांना चाचपडत पुढे पाऊल टाकावे लागते. दुसऱ्या एका नागरिकाने ट्रॅकवर कुत्रे वगैरे फिरतात. काही लोक तर कुत्र्यांना ट्रॅकवरच जेवण वगैरे घालतात.

Fatorda Stadium
Chapora Jetty: मच्छीमारांची आधारस्तंभ असलेली जेटी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; दुर्घटना घडण्याच्या शक्यतेने भीतीचे वातावरण

गोवा क्रीडा प्राधिकरणाने लक्ष घालावे

एका नागरिकाने सांगितले की, चालण्याचा ट्रॅक वर आलेला आहे. त्याला भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ नागरिकांचा पाय त्यामध्ये अडकू शकतो. फुटबॉल गोल पोस्टसाठी उभारलेली जाळी तुटलेली आहे.

त्यामुळे चेंडू ट्रॅकवर फिरत असलेल्या व्यक्तींवर बसून इजा झालेल्या आहेत. गोवा क्रीडा प्राधिकरणाने तसेच क्रीडा मंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com