Accident  Dainik Gomantak
गोवा

ज्यामधून प्रवास केला, त्याच टँकरने चिरडले

साकोर्डात वृद्धेचा मृत्यू : चालकाला अटक

दैनिक गोमन्तक

तांबडीसुर्ल : ज्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्या, त्याच टँकरने चिरडल्यामुळे एका वृद्धेला जीव गमवावा लागला. ही घटना तांबडीसुर्ल - बोळकर्णे मार्गावरील मेस्तवाडा येथे शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली.

लक्ष्मी राम गावकर (वय 70) असे या वृद्धेचे नाव असून बोळकर्णे बाजारात साहित्य खरेदी करून घरी जाताना हा अपघात घडला. याप्रकरणी डोंगरवाडा-साकोर्डा येथील टँकरचालक सत्यवान गावकर याला कुळे पोलिसांनी केली अटक आहे.

लक्ष्मी गावकर या आज सकाळी खरेदीसाठी बोळकर्णे बाजारात गेल्या होत्या. तेथे साहित्य खरेदी करून त्या पाण्याच्या टँकरमधून मेस्तवाडा येथे पोचल्या. तेथे त्यांनी टँकरच्या समोरूनच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी चालकाने टँकर सुरू करून तो निघाला. यावेळी लक्ष्मी गावकर यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने डोके फुटून मेंदू विखुरला होता, तर एक चाक मांडीवरून गेल्याने मांडीचे हाड मोडले होते.

मात्र, या प्रकाराची चालकाला काहीच माहिती नव्हती. तो पुढे जाऊन टँकरमधील पाणी ग्राहकाकडे पोचवून परत येत असताना त्याला मेस्तवाडा येथे अपघात झाल्याचे कळले. तेथे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने ही वृद्धा आपल्या टँकरमधून प्रवास करत होती, असे सांगितले. मात्र, हा अपघात कसा झाला, हे समजले नाही, असे पोलिसांना सांगितले. कुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी संध्याकाळी पोलिस ठाण्यावर येण्यास सांगितले असता, त्याने आपल्याच टँकरखाली येऊन ही वृद्धा ठार झाल्याचे सांगून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी याप्रकरणी चालक सत्यवान गावकर याला अटक केली आहेे. लक्ष्मी गावकर हिच्या मागे चार पुत्र, चार विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

याची माहिती मिळताच कुळेचे पोलिस निरीक्षक संजय दळवी सहकाऱ्यांसह अपघातस्थळी त्वरित दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील यांनीही या अपघाताची माहिती घेतली. लक्ष्मी गावकर यांचा मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. उपनिरीक्षक अजय धुरी यांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Police Station: अभिमान! डिचोली स्थानक देशात पाचव्या क्रमांकावर; उत्कृष्ट पोलिस स्थानकांमध्ये निवड Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; किनारी भागात नवे गटार, नवी गंमत

Bhoma Highway: 'गडकरींचे उत्तर दिशाभूल करणारे'! भोमवासीय बगलमार्गाच्या मागणीवर ठाम; वाद चिघळण्याची शक्यता

Goa Government Job: गोव्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! शासकीय विभागातील 230 पदे भरली जाणार; कसा कराल अर्ज? वाचा..

Arambol: ..अचानक 'त्या' डोंगरावर फिरू लागले ड्रोन! हरमल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिस स्थानकात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT