गोव्यात रेल्वे कायद्याचा भंग केल्याने एकास शिक्षा

रेल्वे कायद्याचा भंग; 2 दिवसांची कैद
Person arrested for violating railway rules in Goa
Person arrested for violating railway rules in GoaDainik Gomantak

फातोर्डा : रेल्वे कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंद्रपाल सिंग याला न्यायालयाने दोषी ठरवताना 500 रुपयांचा दंड आणि तो न भरल्यास दोन दिवसांची कैद सुनावली आहे. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 चा भंग केल्याचा आरोप सिंग याच्यावर आहे. गुन्ह्याचे प्रकरण मडगाव रेल्वे स्थानकावर घडले होते. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. (Person arrested for violating railway rules in Goa)

Person arrested for violating railway rules in Goa
विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे : सुभाष फळदेसाई

मोबाईल चोरीप्रकरणी एकस अटक

मडगाव येथील स्टेशनरोडवरील शेडच्या जागेतून दोन मोबाईल चोरी करण्यात आले असल्याची तक्रार मडगाव पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मागाहून एकाला अटक केली आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन कामगारांनी आपले मोबाईल या शेडच्या ठिकाणी ठेवले होते. या दरम्यान दुचाकीवरून दोन व्यक्ती आपले वाहन पार्क करण्याच्या निमित्ताने आले आणि त्यांनी हे मोबाईल लंपास केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मोबाईल चोरी करण्यात आले तेव्हा कामगार जवळच झोपले होते. दरम्यान, पार्क केलेली दुचाकी परत नेण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी पकडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com