CM Pramod Sawant Phone in Programme Hello Goenkar:  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांच्या 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमात थेट ब्रिटनवरून फोन; काय घडले वाचा सविस्तर...

मुख्यमंत्र्यांसमोर मांडली समस्या

Akshay Nirmale

CM Pramod Sawant Phone in Programme Hello Goenkar: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हॅलो गोंयकार या फोन इन कार्यक्रमात आज शुक्रवारी थेट युनायडेट किंग्डममधून फोन आला. मूळचे गोव्याचे पण सध्या युकेमध्ये वास्तव्यास असलेल्या गोंयकराने आपली समस्या या फोन कॉलमधून मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी ती सोडविण्याचे आश्वासन दिले.

राज्यातील जनतेशी थेट सुसंवाद साधता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या धर्तीवर हॅलो गोंयकार कार्यक्रम सुरू केला होता.

यात लोकांना फोन नंबर उपलब्ध केलेले असून कार्यक्रमाच्या काळात राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची संधी मिळते.

लोकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडता याव्यात आणि त्या प्रश्न-समस्यांची सोडवणूकही तातडीने व्हावी, या उद्देशाने हॅलो गोंयकार या फोन इन कार्यक्रमाची सुरवात केली होती. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होतो.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमात एक कॉल थेट युकेवरून आला. गोव्याबाहेर गेलेले गोंयकार देखील किती दक्ष आहेत, यावरून मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. हॅलो गोंयकार हा कार्यक्रम देशाबाहेरही ऐकला जातोय, ही चांगली गोष्ट आहे.

सेबेस्टिआना मस्कारेन्हास यांनी हा फोन कॉल केला होता. त्यावरून मस्कारेन्हास यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली तक्रार मांडली. त्या म्हणाल्या की, त्या दाबोळी शिरोडा येथील रहिवाशी आहेत. माझे कुटूंबीय गोव्यात राहतात. पण सध्या ते अडचणीत आहेत.

गावातील काही मुलांकडून कुटूंबाला त्रास दिला जात आहे. तिथल्या नाल्यावरून वाद सुरू आहे. पण त्यामुळे आमच्या कुटूंबातील सदस्यांना काही लोक त्रास देत आहेत. तिथे नाला वळवून, मुजवून रस्ता करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर सवाल विचारला गेला म्हणून त्रास दिला जात आहे.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या गोव्यातील नातेवाईकांचे नाव सांगा आणि ते शिरोड्यात कुठे राहतात ते सांगा, अशी विनंती केली. त्यावर आमचे पोलिस दल, जलस्त्रोत मंत्रालय कार्यवाही करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्यावर मस्कारेन्हास यांनी यापुर्वीच 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे अर्ज केल्याचे सांगितले. नातेवाईकांचे नाव रोमा मस्कारेन्हास असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस तक्रार केल्यावर घर फोडले गेले, गाडीचे नुकसान केले गेले, असेही त्यांनी सांगितले.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी माझ्या कार्यालयातील कुणीतरी तुम्हाला पुन्हा संपर्क करेल. यावर निश्चित्तपणे कारवाई केली जाईल. तुम्हाला मेलवरूनही संपर्क साधला जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, या कॉलनंतर मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाची एकप्रकारे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरून एखाद्या गोमंतकीयाने समस्या मांडली आणि त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT