Goa Indore Flight News: गोवा-इंदूर फ्लाईटचे थेट दिल्लीत लँडिंग; एअरलाईन्सच्या चुकीचा प्रवाशांना फटका

इंदूर विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ; प्रवाशांना रिफंड, रीबुकिंगचा पर्याय
Goa Indore Flight News:
Goa Indore Flight News: Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Indore Flight News: अलायन्स एअर या एअरलाईन्स कंपनीच्या एका फ्लाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या कंपनीच्या गोवा-इंदूर फ्लाईटमध्ये वैमानिक चक्क इंदूरमध्ये विमान लँड करायला विसरला. आणि हे विमान थेट पुढे दिल्लीला गेले.

अखेर दिल्लीत या विमानाचे लँडिंग केले गेले. या प्रकारामुळे विमानातील तसेच इंदूर विमानतळावरील प्रवाशांचे मात्र हाल झाले.

अलायन्स एअरमध्ये यापुर्वीही प्रवाशांबाबत असे काही प्रकार घडल्याचे सांगितले जाते. गुरूवारी पुन्हा अलायन्स एअरमध्ये बुकिंग केलेल्या प्रवाशांची फसवणूक झाली. कंपनीचे गोव्याहून इंदूरला जाणारे आणि तिथून दिल्लीला जाणारे विमान काल गोव्याहून थेट दिल्लीला गेले.

Goa Indore Flight News:
Porvorim Murder: पर्वरीतील तरूणीचा प्रेमप्रकरणातून खून; प्रियकराचे कृत्य; आंबोलीत फेकला मृतदेह

त्यामुळे गोव्याहून इंदूरला येणारे आणि इंदूरहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांनी विमानतळावरही गोंधळ घातला.

विमानतळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे फ्लाइट (9I-627/628) दिल्लीहून इंदूरला दुपारी 2.50 वाजता पोहोचते आणि 3.15 वाजता गोव्यात पोहोचते. तेथून रात्री 8.30 वाजता इंदूरला परतते आणि रात्री 8.55 वाजता दिल्लीला पोहोचते.

गुरूवारी, ३१ ऑगस्ट रोजी हे विमान दिल्लीहून इंदूरला दुपारी 3.25 वाजता आले आणि नियोजित वेळेपेक्षा 35 मिनिटे उशिराने 3.50 वाजता गोव्यासाठी रवाना झाले, मात्र गोव्याहून इंदूरला येण्याऐवजी हे विमान थेट दिल्लीला गेले. त्यामुळे कंपनीने गोवा-इंदूर आणि इंदूर-दिल्ली उड्डाणे रद्द केली.

त्यामुळे गोव्यातून येणारे प्रवासी इंदूरला येऊ शकले नाहीत आणि इंदूरहून येणारे प्रवासी दिल्लीला जाऊ शकले नाहीत. कंपनीने ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइट इंदूरऐवजी दिल्लीला वळवल्याचे सांगितले.

Goa Indore Flight News:
CM Pramod Sawant: राज्य सरकारकडून सणाची भेट; गॅस सिलिंडरचे 825 रूपये गणेश चतुर्थीपुर्वीच मिळणार

सूत्रांच्या माहितीनुसार गोवा-इंदूर आणि इंदूर-दिल्ली फ्लाइट्समध्ये खूपच कमी प्रवासी होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी कंपनीने दोन्ही उड्डाणे रद्द केली. इंदूर-दिल्ली फ्लाइट रद्द केल्यामुळे बुकिंग करून विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. कंपनीने प्रवाशांना रिफंड आणि रीबुकिंगचा पर्याय दिला.

दरम्यान, इंदूर ते दिल्ली आणि गोवा दरम्यान कार्यरत असलेली कंपनीची काही उड्डाणे काही काळापासून सातत्याने रद्द होत आहेत. तसेच काही उड्डाणे काही तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे.

या अशा व्यवस्थापनामुळे प्रवाशांनी कंपनीच्या फ्लाइटचे बुकिंग टाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीला कमी प्रवासी मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर कंपनीने रद्द न करता वेळेवर फ्लाईट चालवली तर कंपनीला काही वेळात पुन्हा चांगले प्रवासी मिळू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com