fire
fire Dainik Gomantak
गोवा

Panjim : पणजी येथील हार्डवेअर गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

दैनिक गोमंतक

आज सकाळी पणजी काकुलो मॉल, सांतिनेज परिसरातील एका हार्डवेअर गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आग नियंत्रणात आणली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेत मोठे अर्थिक नुकसान झाले आहेत. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

(A fire broke out at a hardware godown in Panjim Caculo Mall St Inez near Caculo Mall)

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पणजी येथील काकुलो मॉल, सांतिनेज परिसरातील व सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालयाच्या समोर वेगवेगळे साहित्याची गोदामे आहेत. यापैकी हार्डवेअर गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील साहित्य अधिक प्रमाणात जळाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सहाच्यादरम्यान गोदामातून धुराचे लोट निघू लागले. यानंतर काही वेळातच आग लागल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आम्ही अग्निशमन दलाला याची माहिती दिली. व अग्निशमन दलाचे केंद्र जवळच असल्याने तातडीने अग्निशमन दलाचे जवान दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र त्यापुर्वी आगीने वेग घेत साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. थोड्याच वेळात आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाले असून शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले गोमन्तकीयांचे आभार

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Pulitzer Prize 2024: पुलित्झर पुरस्कार 2024 जाहीर! शोध पत्रकारितेसाठी द न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेयर यांचा सन्मान; वाचा संपूर्ण यादी

Lok Sabha Election 2024: बार्देशात ‘सायलंट वोटिंग’चा करिष्मा! कळंगुटमध्ये अल्पसंख्याकांचे मतदान वाढले

रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे सोशल मीडियावर खोटी पत्रके व्हायरल झाल्याने गोंधळ

SCROLL FOR NEXT