Purple Fest 2023: गोव्यात तीन दिवसीय 'पर्पल फेस्त'चे आयोजन; नावनोंदणीसाठी वेळापत्रक जाहीर

Purple Fest 2023: गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
Goa Purple Fest 2023
Goa Purple Fest 2023Dainik Gomantak

Purple Fest 2023: विविधतेचा महोत्सव म्हणून नावलौकिक असलेल्या ‘पर्पल फेस्त’ या महोत्सवाचे आयोजन 6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत पणजीतील गोवा मनोरंजन संस्थेमध्ये होणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

काल पर्पल फेस्टच्या वतीने या महोत्सवात सहभागासाठी नावनोंदणीची अंतिम मुदत 20 डिसेंबर असल्याचे जाहीर करण्यात आले. नावनोंदणी https://scpwd.goa.gov.in/ या संकेतस्थळावर करता येते. सर्व गोमंतकीयांसाठी नावनोंदणी मोफत आहे.

Goa Purple Fest 2023
Goa Tourism: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; गोव्यात आता लवकरच 'नॉटीकल टुर्स'

या तीन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून एकमेकांस मदत करण्यासाठी लोक कसे एकत्र येतात, याचे प्रदर्शन घडणार आहे. थेट सादरीकरण, प्रदर्शन, क्रीडा उपक्रम, वैविध्यपूर्ण अनुभवात्मक विभाग आणि सर्जनशील मेळा, असे विविध उपक्रम या महोत्सवात होणार आहेत. तसेच विविध स्पर्धा, चित्रपटांचे स्क्रीनिंग, मेगा कार रॅली यांसह शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि स्वावलंबी जीवन याबाबत चर्चात्मक उपक्रमही या महोत्सवात होणार आहेत.

या उपक्रमात आपल्या व्यावसायिक उत्पादनांचे, सेवांचा स्टॉल मांडण्यासाठी प्रति स्टॉल 2500 रुपये, तर खाद्योत्पादनांच्या स्टॉलसाठी 15,000 रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण हाच उद्देश

दिव्यांग व्यक्तींना भेडसावणारे उपेक्षा, भेदभाव, कलंक, वगळले गेल्याचा अनुभव किंवा वेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन अशा समस्यांचे अडथळेही दूर करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

मानसिक, शारिरीक, प्रणालीत्मक, संवादात्मक आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे अपंगत्व निर्माण होते या विचाराचाही प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. अपंगत्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आणि हे अडथळे दूर करण्यासाठी दिव्यांगांना सहकार्य करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com