Panjim: पणजीत सुसज्ज अन् स्वच्छ शौचालयांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज

Panjim: पणजीत लाखो पर्यटक येतात, त्या अनुषंगाने पणजी शहराला अधिक शौचालयांची गरज आहे.
Toilets
ToiletsDainik Gomantak

Panjim: राजधानी पणजीत लाखो नागरिक येत असतात. यात पर्यटक, कर्मचारी, आदींचा समावेश आहे. राजधानीच्या अनुषंगाने विचार करता पणजी शहराला अधिक शौचालयांची गरज आहे. तसेच असलेल्या शौचालयांत सुविधा वाढविण्याची गरज आहे. तसेच दुरुस्तीबरोबरच शौचालयांची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे.

शौचालयांच्या डागडुजीची गरज आहे. यासाठी राज्य सरकार तसेच महानगरपालिकेने देखील पाऊले उचलणे गरजेचे आहे. राजधानीत असलेली शौचालये सुस्थितीत आहेत, मात्र त्यात काही प्रमाणात डागडुजी करणे गरजेचे आहे.

अनेक पर्यटक पणजी बसस्थानकातील शौचालयात येत असतात, तेथे अंघोळी करता येते, मात्र जर गरम पाणी हवे असेल, तर तेथे मिळत नाही. या शौचालयाला पाणी टॅंकरद्वारे पुरविण्यात येते. त्यामुळे पाण्याची देखील चांगली सोय नाही. या शौचालयांमध्ये अंघोळीसाठी 30 रूपये आकारले जातात.

Toilets
Purple Fest 2023: गोव्यात तीन दिवसीय 'पर्पल फेस्त'चे आयोजन; नावनोंदणीसाठी वेळापत्रक जाहीर

बस स्थानकावर दुर्गंधी

पणजी बसस्थानकावर अनेक नागरिक मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी जातात. यावर आळा घालण्यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे. एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की अनेकांना पैसे देऊन शौचालयात जायचे नसते.

त्यामुळे अशा प्रकारची कृत्ये ते करत असतातच. त्यामुळे बसस्थानकावर मोफत शौचालयाची सोय असणे गरजेचे आहे आणि मोफत शौचालय असून देखील एखादी व्यक्ती उघड्यावर लघु शंका करत असेल तर त्याला दंड ठोठावणे गरजेचे असल्याचे आहे, असे नागरिकांचे मत आहे.

स्वच्छतेचा अभाव

अनेक शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव जाणवतो. सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवणे जसे तेथील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे नागरिकांचे देखील कर्तव्य आहे. अनेक शौचालये अस्वच्छ आहेत. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून शौचालये स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. परिसर स्वच्छ ठेवावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com