Morjim Beach Goa Dainik Gomantak
गोवा

Turtle Nesting Goa: मोरजी किनाऱ्यावर 61 सागरी कासवांची 6000 पेक्षा जास्त अंडी..

Morjim Beach Turtle Nesting: अंडी घातल्यानंतर साधारण ५० ते ५२ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात

Akshata Chhatre

Turtle Nesting: मोरजी येथील तेमवाडा समुद्रकिनाऱ्यावर २८ डिसेंबर ते २ फेब्रुवारी या कालावधीत ६१ सागरी कासवांनी ६ हजारपेक्षा जास्त अंडी घातली. हा किनारा साल १९९७ पासून सागरी कासवांसाठी संरक्षित केलेला आहे.वन विभगातर्फे येथे कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. साधारण डिसेंबरपासून सागरी कासव अंडी घालण्यासाठी या किनाऱ्यावर दाखल होतात. या अंड्यांचे संरक्षण करून पिल्ले जन्माला आल्यानंतर त्यांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडले जाते. अंडी घातल्यानंतर साधारण ५० ते ५२ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात.

बहुतांश रात्रीच्यावेळी सागरी कासव किनाऱ्यावर दाखल होतात व रेतीत सुरक्षित जागी अंडी घालतात. परंतु कासवांच्या पावलांचे ठसे किनाऱ्यावर उमटत असल्याने कासवाने कुठे अंडी घातली आहे हे सहज समजते, त्यामुळे पूर्वी या अंड्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असे. तसेच काही स्थानिकही ही अंडी शोधून उकडून खात असत. त्यामुळे सागरी कासवांसाठी हा किनारा असुरक्षित झाला होता. याची दखल घेत सरकारने हा किनारा कासवांसाठी संरक्षित करून कासव संवर्धन मोहीम चालीस लावली, त्यामुळे कासवांना संरक्षण मिळाले आहे.

आता या किनाऱ्यावर कासवाने कोठेही अंडी घातल्यास वन विभाग ती अंडी ताब्यात घेउन तेथील कासव संवर्धन केंद्रात त्या अंड्यांची संरक्षण करतो व अंड्यांतून पिल्ले बाहेर आल्यानंतर सुरक्षितरित्या समुद्रात सोडली जातात.

गेल्यावर्षी या समुद्री कासवांच्या अंड्यांबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली, आणि म्हणून यंदाच्यावर्षी सरकारकडून ही माहिती गुप्त ठेवण्यात आलीये. कुणालाही जर का याबाबतीत आणखीन महती अपेक्षित असेल तर त्यांनी कंपाल, पणजी येथून माहिती घ्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील मोरजीचे सरपंच पावन मोरजे यांनी ठिकाणाची पाहणी केली होती आणि सरकारकडून सर्व प्रकारची माहिती याच कासव संवर्धन केंद्रात उपलब्ध व्हावी अशी मागणी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप यावर काही कारवाई झाल्याचे दिसत नाही. कासव संवर्धन केंद्रात अंड्यांची दिवस रात्र सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रहाण्याची, शौचालयाची व्यवस्थित सोय उपलब्ध नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT