Nest of sea turtles : आगोंद किनाऱ्यावर सागरी कासवांची घरटी

सागरी कासव आपली अंडी घालण्यासाठी जन्म किनाऱ्यावरच येतात
turtle
turtledainik gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण : सागरी कासव अंडी घालण्यासाठी आपल्या जन्म किनाऱ्यावरच येतात. त्यासाठी त्यांना सागरी प्रवाह किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा आधार मिळत असतो. त्यामुळेच सागरी कासव आपली अंडी घालण्यासाठी अचूक किनाऱ्यावर येत असतात. मानवाप्रमाणे त्याच्याकडे लोहचुंबकीय कम्पास जरी नसला तरी तर मादी अंडी घालण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या जन्म किनारा अचूक शोधून काढते, हे संशोधन अंती शास्त्रज्ज्ञांनी शोधून काढले आहे. (Nest of sea turtles on Agond shore)

मादी अंडी घालण्यासाठी ज्या किनाऱ्यावर तिचा जन्म झाला त्याच किनाऱ्यावर अंडी (Eggs) घालण्यासाठी येते. हे सत्य असल्याचे खोतीगाव अभयारण्याचे क्षेत्रिय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले. वेळीप यांच्याकडे काणकोण तालुक्यातील गालजीबाग व आगोंद सागरी कासव संवर्धन केंद्राचा ताबा आहे. गालजीबाग किनाऱ्यावर गेल्यावर्षी फक्त चार सागरी कासवांची घरटी होती. आज ती संख्या अकरा झाली आहे.

त्यापैकी एक घरट्यात मडगाव येथून आणलेली अंडी असून दुसरे घरटे राजबाग- तारीर किनाऱ्यावरून स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यापैकी एका घरट्यातून ११२ पिले बाहेर आली. त्यानंतर ती समुद्रात (Sea) सोडून देण्यात आले आहे. आगोंद किनाऱ्यावर गेल्या वर्षी ३५ सागरी कासवांची घरटी होती. आता पर्यंत या किनाऱ्यावर २७ सागरी कासवाचे आगमन झाले असून त्यांनी सुमारे ३५०० अंडी घातली आहेत. त्यापैकी आठ घरट्यातून पिल्ले बाहेर येऊन त्यांना समुद्रात सोडण्यात आले आहे. बदलत्या वातावरणामुळे सागरी कासवांचे आगमनावर परिणाम झाला आहे. मात्र आतापर्यंत दोन्ही किनाऱ्यावर सागरी कासवांचे आगमन समाधानकारक असल्याचे क्षेत्रीय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले.

turtle
‘आसानी’मुळे गोव्याच्या विविध भागांमध्ये हलका ते जोरदार पाऊस

सागरी कासव अंडी घालण्यास किनाऱ्याकडे येताना संधीप्रकाशाचा आधार घेतात त्याचप्रमाणे अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर ती समुद्राकडे झेपावताना संधी प्रकाशाच आधार घेत असतात. किनाऱ्यावर पथदिवे किंवा पर्यटन अस्थापनात वीजेचे दिवे पेटत असल्यास सागरी कासव व अंड्यातून बाहेर आलेली पिल्लांची संधीप्रकाशाच्या बाबतीत या प्रकाशामुळे दिशाभूल होऊन ती किनाऱ्याच्या बाहेर जाऊन भटकी कुत्री व अन्य प्राण्याची शिकार ठरू शकतात. त्याच्यासाठी सागरी कासवांसाठी (turtles) आरक्षित करण्यात आलेल्या किनाऱ्यावर पथदिवे किंवा पर्यटन (Tourism) व्यवसायाला निर्बंध असल्याचे वनाधिकाऱ्यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com