मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबंवाडा किनारी भागात यंदाच्या हंगामात २४, २५ आणि २७ डिसेंबर रोजी एकूण तीन सागरी कासवांनी ३३४ अंडी घातली. ही अंडी वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावर सुरक्षित जाळी मारून त्याचे संरक्षण करण्याचे काम सुरू केलं.
गेल्या वर्षी मोरजी समुद्रकिनाऱ्यावर एकूण १०५ सागरी कासवांनी ११,१३० अंडी घातली होती, त्यातील ७७६७ पिल्ले समुद्रात सोडली होती.
मांद्रे पंचायत क्षेत्रातील एकूण एकूण ४० सागरी कासवांनी ४०३२अंडी घातली होती. त्यातील२८९९ पिल्ले समुद्रात सोडली होती. तर हरमल किनारी ११ सागरी कासवांनी १२७७ अंडी घालून ८६३ पिल्ले समुद्रात सोडली होती. तर केरी पंचायत क्षेत्रात एकूण १२ सागरी कासवे आणि १२५० अंडी घातली होती. त्यातील ८३७ पिल्ले समुद्रात सोडण्यात वन विभागाला आणि मरीन रेंजला यश मिळाले होते.
मोरजी पंचायत क्षेत्रात १९९७ पासून सागरी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. सुरुवातीला ही मोहीम वन खाते अंतर्गत राबवली जायची. त्यानंतर वन्य विभागाकडे देण्यात आली. आता वन्य विभाग आणि मरीन विभाग यांच्यामार्फत ही मोहीम यशस्वीपण राबवण्याचं काम सरकार करत आहे. २००० साली मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांची निवड झाली होती. तेव्हापासून किनारी भागात एकूण ५०० चौ. मी. जागा कासव संवर्धन मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांनी आरक्षित केली होती. आणि या ठिकाणी ही कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवण्याचं काम केलं जात आहे.
सागरी कासव संवर्धन मोहीम ज्या ठिकाणी राबवली जाते. त्या ठिकाणी हंगामी स्वरूपाची झोपडी म्हणून अभ्यास केंद्र वन्य विभागातर्फे कार्यरत करण्यात येत आहे. या ठिकाणी पक्के अभ्यास केंद्र उभारावे,अशी मागणी कित्येक वर्षापासून पर्यावरण प्रेमींनी केली होती. त्या संदर्भात गतवर्षी या सागरी कासव संवर्धन मोहिमेच्या जागेला वनमंत्री विश्वजीत राणे यांनी भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक पत्रकारांनी त्यांना या किनाऱ्यावर कधी पक्के अभ्यास केंद्र उभारणार असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी सीआरझेड विभागाची परवानगी घेऊन या किनाऱ्यावर एक पक्के बांधकाम करून अभ्यास केंद्र तयार करण्याची ग्वाही दिली होती. परंतु अजून पर्यंत हे अभ्यास केंद्र उभारण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
आतापर्यंतच्या इतिहासात गेल्यावर्षी सर्वाधिक १६७ सागरी कासवाने मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल आणि केरी या चारही किनाऱ्यावर अंडी घालण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातून एकूण १७६८९ अंडी घातली होती. तर त्यातील १२,३६६ पिल्लांना यशस्वीपणे समुद्रात सोडवण्यास वन विभागाला यश मिळाले. चार वर्षांपूर्वी सरकारने मोरजी आश्वे मांद्रे हे दोन किनारे संवेदनशील किनारे म्हणून घोषित केले. परंतु त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत असताना दिसत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.