गोवा: बेकायदेशीर प्रकरणांची तक्रार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ईमेलवर आतापर्यंत तब्बल 61 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तर विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या विरोधात 1 तक्रारी प्राप्त झाली असल्याची माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
(61 complaints received on TCP email including one against Michael Lobo)
लोबो यांच्याविरोधात आलेली तक्रार बेकायदेशीररीत्या जमिनीचा झोन बदलल्याची असल्याची माहिती विश्वजित राणेंनी दिली. ते म्हणाले, “बेकायदेशीरतेची तक्रार करण्यासाठी ईमेल पत्ता लॉन्च केल्यापासून आम्हाला 61 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत ही संख्या दुप्पट झाली आहे आणि आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी खूप आनंदी आहे”,असे त्यांनी ट्विट केले आहे.
ई-मेल प्रकरणाबाबत अमित पाटकर यांचा राणेंवर घणाघात
नगरनियोजन व वन खात्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्या आपल्या ई-मेलवर पाठवाव्यात या नगरनियोजन व वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या आवाहनाला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. गोवा ही कोणाची खासगी मालमत्ता नसून सरकारी कामासाठी खासगी ई-मेल कसे वापरले जाऊ शकतात? असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.