गीता शणै यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार!

'बहुजिव्हा भारतीक ऐकत्यांच्या आरती' या पुस्तकासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कन्नड लेखिका गीता शणै
कन्नड लेखिका गीता शणैDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केंद्रीय साहित्य अकादमीचे 2021 वर्षाचे अनुवादित पुस्तकासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून कोकणी विभागात बंगळुरू स्थित कोंकणी व कन्नड लेखिका गीता शणै यांना 'बहुजिव्हा भारतीक ऐकत्यांच्या आरती' या पुस्तकासाठी प्राप्त झाला आहे.

(Sahitya Akademi Translation Award for Geeta Shanai's book)

कन्नड लेखिका गीता शणै
गोव्यात आज, उद्या ऑरेंज अलर्ट जारी; राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार: IMD

50 हजार रुपये रोख व ताम्रपत्र अशा स्वरूपात हा पुरस्कार असून ज्येष्ठ कन्नड लेखकडाॅ. के. व्ही. पुट्टप्पा यांच्या 'विचार कर्णीगे आव्हान' या मूळ कन्नड भाशेतील गाजलेल्या निबंध संग्रहाचा हा कोकणी अनुवाद आहे.

भारतीय टेलिफोन खात्याच्या माजी कर्मचारी असलेल्या गीता शणै या कर्नाटक राज्यातील कन्नड आणि कोकणी भाषेतील गणमान्य साहित्यिक असून त्यांनी आतापर्यंत इंग्रजी आणि कोंकणी साहित्याचा कन्नड भाषेत तर कन्नड साहित्याचा कोंकणी भाषेत अनुवाद केला आहे. 32 पुस्तके त्यांनी लिहिली असून त्यांचे 700 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

कन्नड लेखिका गीता शणै
कथित वीज घोटाळ्यातून माविन गुदिन्हो सुटणार?

शणै यांनी गोव्यातील महाबळेश्वर सैल यांच्या 3 कादंबऱ्यांचा कन्नड भाषेत अनुवाद केलेला असून मीना काकोडकर यांचा 55 कथांचा अनुवाद केला आहे. त्याशिवाय जयंती नाईक, माया खरंगटे आणि गोकुळदास प्रभू यांच्या कथाही त्यानी कन्नड भाषेत अनुवादित केल्या आहेत.

"साहित्य अकादमीचा पुरस्कार मला मिळाला त्याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा ज्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला त्याचा जास्त आनंद वाटतो. कारण डॉ. पुटप्पा यांचा मूळ कन्नड भाषेतील निबंध संग्रह अत्यंत गाजलेले पुस्तक असून आतापर्यंत या पुस्तकाचे आठ भाषांत अनुवाद झाला असून त्यातील कोकणी पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे."

- गीता शणै, लेखिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com