Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: परदेशात नोकरी करायचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं, मडगावात रेल्वे रूळावर आढळला युवकाचा मृतदेह

Goa Railway Track Death: जहाजावरील नोकरीसाठी परदेशात जाण्यापूर्वी मुंबईत व्‍हिसा नूतनीकरण करून रेल्वेतून परतताना फातोर्डा येथील २१ वर्षीय युवकावर काळाने घाला घातला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: जहाजावरील नोकरीसाठी परदेशात जाण्यापूर्वी मुंबईत व्‍हिसा नूतनीकरण करून रेल्वेतून परतताना फातोर्डा येथील २१ वर्षीय युवकावर काळाने घाला घातला. या युवकाचा मृतदेह मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरील रेल्वे रूळावर सापडला. जेरिको डिकॉस्ता असे या दुर्दैवी युवकाचे नाव असून, तो माडेल-फातोर्डा येथील रहिवासी होता.

तो रेल्वेतून खाली पडला असावा किंवा रूळ ओलांडताना त्याला रेल्वेची धडक बसली असावी, असा संशय कोकण रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सध्या पोलिस तपास करीत आहेत.

मृताची ओळख पटली असून, या घटनेमागील निश्चित कारण पडताळून पाहणार असल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिली.

जेरिको लवकरच परदेशात जहाजावर कामासाठी जाणार होता. मुंबईत व्‍हिसा तयार करून तो परत येत होता. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळला. त्यानंतर पोलिसांनी तपास काम हाती घेतले. मृताची ओळख पटविली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदविले आहे.

रेल्वे स्थानकावर पित्याचा भ्रमनिरास

जेरिकोचे वडील त्याला आणण्यासाठी बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मडगाव रेल्वे स्थानकावर गेले होते; परंतु जेरिको काही आला नाही. नंतर सकाळी साडेसातच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण डिकॉस्ता कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या मृतदेहावर मंगळवार, २२ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT