Green Lungs Goa: राज्यातील शहरांना प्राणवायूचे 'बूस्ट', 'ग्रीन लंग्‍स' उपक्रमाला राज्यातील पालिकांचा पाठिंबा; वनमंत्री राणे यांची माहिती

Vishwajit Rane On Green Lungs Project: वनविभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
Green Lungs Goa
Green Lungs GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वाढते तापमान आणि हवामान बदलाला तोंड देतानाच शहरांमध्ये नैसर्गिकरित्या प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य सरकारने ‘ग्रीन लंग्स’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याला राज्यातील सर्व पालिकांनी पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

वनविभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. ही योजना नागरी परिसरात हिरवाई वाढवून प्रदूषण कमी करणे, जैवविविधतेला चालना देणे आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी जागा निर्माण करणे, या उद्देशाने राबवली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमासाठी पणजीमध्ये आयोजित केलेल्या बैठकीस वनविभाग, नगरविकास विभाग, नगरपालिका प्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘शहरी वृक्षारोपण आणि तापमान नियंत्रण’ या विषयावर सादरीकरण आणि सखोल चर्चा झाली.

Green Lungs Goa
Goa Contract Teachers: आमच्यावर अन्याय करु नका! कंत्राटी शिक्षकांचं सावंत सरकारकडं गार्‍हाणं; सेवेची ओलांडली वयोमर्यादा

‘ग्रीन लंग्स’ म्हणजे काय?

शहरी भागातील हिरवळीच्या जागा, ज्या प्रदूषण कमी करतात, हवामान नियंत्रणास मदत करतात, जैवविविधतेस चालना देतात आणि नागरिकांसाठी शुद्ध प्राणवायू, सावली आणि शांतता देणारे स्थान बनतात, त्याला ‘ग्रीन लंग्स’ असे संबोधले जाते.

‘मियावाकी’ पद्धत म्हणजे काय?

मियावाकी ही एक वेगाने जंगल निर्माण करण्याची नैसर्गिक आणि वैज्ञानिक पद्धत आहे. ही तंत्रज्ञान जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केली असून, अल्प जागेत, कमी वेळेत आणि स्थानिक वृक्ष प्रजातींचा वापर करून घनदाट जंगल निर्माण करण्यावर भर देते. याद्वारे स्थानिक वृक्षप्रजातींचा वापर करून ३० गुंठ्यांपेक्षा कमी जागेतही जंगल उभारता येते. झाडे एकमेकांच्या जवळ लावली जातात. त्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने होते.

कसे असते व्हर्टिकल गार्डन?

‘व्हर्टिकल गार्डन्स’ म्हणजे भिंतींवर किंवा उभ्या पृष्ठभागावर तयार केलेली बाग. या पद्धतीत झाडे आणि फुलझाडे उभ्या पद्धतीने लावली जातात. जागेची मर्यादा असलेल्या शहरी भागांत ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रकारात उंच इमारतींच्या भिंतींवर किंवा सार्वजनिक जागांवर हरित पॅनेल बसवून वनस्पतींची लागवड केली जाते.

Green Lungs Goa
Goa Education: ‘शिक्षणाच्या आयचा घो’ चित्रपट पुन्हा आठवतोय– बदललेल्या शैक्षणिक वर्षामुळे गोव्यातील विद्यार्थ्यांची फरफट!

...असा असेल वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

  • सोनसडो येथे मियावाकी पद्धतीने जंगल

  • शहरी भागांमध्ये व्हर्टिकल गार्डन्स

  • स्थानिक जैवविविधतेला प्राधान्य

  • ओल्या कचऱ्याचा खतासाठी वापर

  • पावसाचे पाणी साठवून सिंचनासाठी वापर

  • शाश्वत आणि पर्यावरणपूरक डिझाईन

  • नगरविकास आणि वन विभागाचे संयुक्त नियंत्रण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com