Goa voters missing X
गोवा

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Goa electoral roll update: राज्याचे मुख्य मतदार अधिकारी संजय गोयल यांनी शनिवारी (१३ डिसेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील एकूण ११ लाख ८५ हजार ३४ मतदारांपैकी १ लाख ७८ हजार मतदार (८.४५ टक्के) मतदार मतदान केंद्र अधिकाऱ्यांना सापडलेले नाहीत. त्यापैकी २५,५७४ मतदार मरण पावले आहेत, अशी माहिती मिळाली.

राज्याचे मुख्य मतदार अधिकारी संजय गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की भारत निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार गोवा राज्यातील मतदारयादी विशेष पुनरिक्षण अंतर्गत मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

२७ ऑक्टोबर रोजीच्या स्थितीनुसार राज्यात एकूण ११ लाख ८५ हजार ३४ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी १० लाख ८४ हजार ९५६ मतदारांची नोंदणी माहिती संकलित करून संगणकीकरण करण्यात आली असून हे प्रमाण ९१.५५ टक्के आहे.

उर्वरित १ लाख ७८ मतदार (८.४५ टक्के) हे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रिय तपासणी करून, किमान तीन वेळा भेटी दिल्यानंतर 'नोंद न होणारे' म्हणून नोंदवले आहेत.

१० डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये मतदार नोंदणी अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत नोंद न होणाऱ्या मतदारांची यादी चर्चा करून अंतिम करण्यात आली.

या बैठकींचे इतिवृत्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १२ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

मतदारांचा तपशील असा

१) मृत-२५,५७४

२) सापडले नाहीत किंवा अनुपस्थित - २९,७५०

३) कायमस्वरूपी स्थलांतरित - ४०,४७३

४) आधीच इतर ठिकाणी नोंदणीकृत - २००८

५) फॉर्मवर स्वाक्षरी न केलेले, फॉर्मला नकार दिलेले - २,२७३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT