

पणजी: गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन नाईट कल्बमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेला. या घटनेबाबत रोज नवीन खुलासे समोर येत असताना आता कल्ब डान्सरच्या पतीने देखील यावर भाष्य केले आहे. ही घटना घडली त्यावेळी कल्बमध्ये डान्स करणाऱ्या क्रिस्टिनाला मोठा मानसिक धक्का बसल्याचे तिच्या पतीने सांगितले आहे.
क्रिस्टिना या धक्क्यातून अद्याप सावरली नसून ती प्रत्येक वेळी भावूक होत असल्याचे तिच्या पतीने सांगितले. क्रिस्टिनाचा पती मिखैल बुकीन एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना भावूक झाला.
क्रिस्टिना गेल्या सहा दिवसांपासून व्यवस्थित झोपू शकली नाही. तिनं घरातून बाहेर पडणं बंद केलंय. मानसिक धक्का आणि वारंवार रडण्यामुळे तिचं पाच किलो वजन कमी झाले आहे, असे मिखैल म्हणाला.
"ती वारंवार रडत आहे. तिचं आयुष्यच उद्धवस्त झालंय, आगीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला पण, माझी बायको वाचली असली तरी जिंवत मुडद्यासारखी आहे." आमच्या संपूर्ण कुटुंबीयांसाठी ही वेळ खूप खडतर असल्याचे मिखैल म्हणाला.
आग प्रकरणी कल्बचे मालक लुथरा बंधुंना थायलंड येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास केला जात असून, आत्तापर्यंत ६० जणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. कल्ब डान्सर क्रिस्टिनाचा देखील काही दिवसांपूर्वी जबाब नोंदविण्यात आला होता.
पोलिसांनी कल्ब डान्सर क्रिस्टिनाचा देखील जबाब नोंदवला आहे. हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन हा नाईट कल्ब सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या मालकीचा आहे. लुथरा बंधुंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लथुरा बंधुंना थायलंड येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.