कळंगुट: नववर्षाच्या (New Year) पहाटे कळंगुटमध्ये आगीचे तांडव, नवीन कपड्यांची चौदा दुकाने खाक झाली. सर्वजण नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात गुंतलेले असतानाच रविवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास गांवरावाडा-कळंगुट (Calangute) येथे कपड्यांच्या एकूण चौदा गाळेवजा दुकानांना आग लागली. या आगीत अंदाजे पन्नास लाखांवर रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती झाल्याची राहुल मौर्या यांनी दिली.
पहाटे दोनच्या सुमारास लागलेली ही आग पिळर्ण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्वत्र पसरल्याने एकाच एका बाजुची चौदाही दुकाने जळून खाक झाली. कळंगुट-कांदोळी येथील मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या गांवरावाडा परिसरात वसायिकांकडून थाटण्यात आलेल्या येथील दुकानांत नववर्षाच्या निमित्ताने दुकान मालकांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी नवीन माल साठवून ठेवला होता. दुर्दैवाने, रविवारी पहाटेच्या आगीत या गाळेवजा दुकानतील सर्व माल भस्मसात झाला.
रस्त्याशेजारी पार्क करून ठेवण्यात आलेल्या पर्यटकांच्या कारगाडीनेही पेट घेतल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षीच या भागात कपड्यांची दुकाने थाटून देशी तसेच विदेशी पर्यटक गिऱ्हाइकांवर अवलंबून असलेल्या तसेच आपला छोटेखानी व्यवसाय सांभाळणाऱ्या व्यावसायिकांवर नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अग्निशमन दलाने प्रयत्न करूनही बरीच मालमत्ता भस्मसात झाली. आपत्तीग्रस्तांनी मंत्री मायकल लोबो यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली व आर्थिक मदतीची मागणी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.