Goa Covid Updates: राज्यात 1338 सक्रिय रूग्ण, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त!

310 नवे रुग्ण, दिवसेंदिवस गोव्यात कोरोनाचा प्रसार वाढतोय
Goa Covid Updates

Goa Covid Updates

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी : जगभर वाढत असलेल्या ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोना व्हेरियन्टचे (Covid-19) संक्रमण आणि प्रादुर्भाव वाढतच आहे. याचा फटका आता राज्यालाही बसत असल्याचा अंदाज आहे. अर्थात याबाबत राज्य सरकारकडून (Goa Government) अधिकृत माहिती जाहीर केली नाही. मात्र, नव्या व्हेरियन्टमुळे हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. तसेच गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हे तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्यात आलेले लाखो पर्यटक (Tourist) आता परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गोव्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे, बसेस अगदी विमानेही फुल्ल आहेत. मात्र, पर्यटन स्थळे, समुद्र किनारपट्टी (Goa Beach), कॅसिनो (Casino) आणि हॉटेल्समध्ये आयोजित पार्ट्यांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे येत्या आठवडाभरात ही रुग्ण संख्या अशीच वाढत जाईल अशी शक्यता आहे.

कोरोना (Covid-19) तज्ज्ञ कमिटीने सुचवलेल्या उपायांकडे सरकारने (Goa Government) केलेले दुर्लक्ष सरकारच्या आरोग्य खात्याला महागात पडू शकते अशी भीती आहे. यासाठी सोमवारी कृती दलाची बैठक होत आहे. यात याबाबतचे पुढील निर्णय घेतील घेतले जातील अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Covid Updates</p></div>
गोव्यातील शाळा अन् कॉलेज 15 दिवसांसाठी बंद ठेवावेत; तज्ञांनी केली शिफारस

कृती दलाची बैठक

राज्यात वाढत असलेले कोरोना बाधित रुग्ण आणि संभाव्य धोके या पार्श्वभूमीवर कृती दलाची बैठक सोमवारी होत आहे. यामध्ये रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) सीमा (बॉर्डर) वरील तपासणी नाक्यांवर कार्यांमध्ये बदल याशिवाय अन्य उपाययोजनांची अंमलबजावणीची शिफारस होऊ शकते.

राज्यभरात 1338 सक्रिय

सध्या राज्यात तब्बल 1338 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामूळे मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 522 कायम आहे. काल दिवसभर 4959 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी तब्बल 310 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या पाच दिवसांत तब्बल 1065 रुग्णांची वाढ झाल्याने चिंता निर्माण झाली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Covid Updates</p></div>
वा रे बहाद्दर! कळगुंट-बागा बीचवरून 65 मोबाईल चोरीला

सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. पर्यटकांची वाढलेली वर्दळ आणि आणि इतर सर्व्हिसमुळे पुढील आठवडाभर हे प्रमाण असेच राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून कोरोनासंबंधीचे कोणतीही लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्यावी. हा संक्रमण काळ असल्याने लोकांनी आरोग्याच्या कोणत्याही बाबतीत दुर्लक्ष करू नये.

- डॉ. शेखर साळकर, सदस्य कृती दल

रुग्णांचे वाढते प्रमाण हे तिसऱ्या लाटेचे लक्षण आहे. हे प्रमाण असेच वाढत गेल्यास तीन आठवड्यांत राज्यात कोरोनाचा उद्रेक होवू शकतो. हे मागील वर्षापेक्षा तिप्पट असेल. यासाठी सर्वांनी सतर्क होणे गरजेचे आहे. यावेळी डॉक्टरांची कमी भासू शकते. इतर सुविधांच्या बाबतीत राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ.धनेश वळवईकर, बालरोग तज्ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com