CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकाचा गोव्यातील महिलांना फायदा, 13 जागा आरक्षित : मुख्यमंत्री डॉ. सावंत

महिला आरक्षण विधेयकाचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वागत केले.

Rajat Sawant

Women's Reservation Bill Benefits For Goa Women: राज्यसभेत गुरुवारी 215 सदस्यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करीत विधेयक मंजूर करण्यात आले. हे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे 128 वे घटनादुरुस्ती विधेयक आहे.

दरम्यान, हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे नाव 'नारी शक्ती वंदन कायदा' (nari shakti vandan adhiniyam) असे असेल. या विधेयकाचे देशभरातून स्वागत करण्यात येत असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या विधेयकाचे स्वागत केले.

विधेयकाचे स्वागत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "राज्यसभेत 'नारी शक्ती' विधेयकाचे मी स्वागत करतो. या विधेयकामार्फत नारीचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. या विधेयकामुळे गोव्यातील 13 मतदारसंघ महिलांसाठी राखीव असतील."

"गोव्यातील 13 जागा राखीव असल्याने गोव्यातील महिलांसाठी ही चांगली बातमी आहे. यानिमित्ताने महिला प्रतिनिधी लोकसभेत आणि विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व करतील. गोवा भाजप, सरकार व गोव्याच्या नागरिकांच्यावतीने या विधेयकाचे स्वागत करतो." असे म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, "जेडीएसने एनडीएमध्ये प्रवेश केला ही चांगली बाब आहे. याचा फायदा आम्हाला येत्या 2024च्या लोकसभा निवडणूकीत निश्चितच होईल" असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, गोव्यातील महिलांना आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी 2031 ची वाट पाहावी लागेल अशी टिका गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. जनगणनेनंतरच मतदारसंघांचे नवीन सीमांकन होऊ शकते. त्यामुळे आरक्षण लागू होण्यास विलंब होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT