MS Dhoni: "धोनी घेणार रिटायरमेंट"! माजी खेळाडूने केले धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, IPL आली की तो..

MS Dhoni Retirement: चर्चासत्रात सांगितले की, चेन्नई संघ आणि धोनी यांचे नाते इतके घट्ट आहे की त्याच्याशिवाय संघाची कल्पनाच करणे कठीण आहे.
MS Dhoni IPL | MS Dhoni Retirement
MS Dhoni IPL | MS Dhoni RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन कूल धोनीच्या भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. माजी भारतीय खेळाडू इरफान पठाण याचे मत आहे की, यंदाचा हंगाम चाहत्यांना धोनीला चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत पाहण्याची कदाचित शेवटची संधी ठरू शकते.

पठाणने एका चर्चासत्रात सांगितले की, चेन्नई संघ आणि धोनी यांचे नाते इतके घट्ट आहे की त्याच्याशिवाय संघाची कल्पनाच करणे कठीण आहे. दरवर्षी स्पर्धेचा काळ जवळ आला की धोनी पुन्हा मैदानावर सज्ज दिसतो. यंदाही तो चांगल्या तंदुरुस्तीत दिसत असल्याचे नमूद केले.

दरम्यान, चेन्नई संघाने अलीकडेच संजू सॅमसनची देवाणघेवाण करून संघात घेतल्यामुळेही चर्चेला उधाण आले आहे. या निर्णयामुळे धोनीची मैदानावरील भूमिका काहीशी कमी होऊन ते संघातील तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यावर अधिक भर देईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

MS Dhoni IPL | MS Dhoni Retirement
MS Dhoni Viral Video: सिगारेटचं पाकीट धोनीचं की साक्षीचं? सलमानच्या पार्टीदरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी 'माही'ला धरलं धारेवर

या हंगामात संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे असून, धोनीचा अनुभव तरुण खेळाडूंना उपयोगी पडेल, असे पठाण यांनी सांगितले. ड्रेसिंगरूममध्ये त्यांची उपस्थिती संघाला एकत्र ठेवण्यास महत्त्वाची ठरेल, असेही नमूद केले.

MS Dhoni IPL | MS Dhoni Retirement
Gautam Gambhir IPL Offer: सीईओ, मेंटॉर अन् पार्टनर... गौतम गंभीर टीम इंडियाचं हेड कोच पद सोडणार? 'या' IPL टीमकडून मोठी ऑफर!

चेन्नई संघ व्यवस्थापनाने धोनी संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी संघातील तरुण खेळाडूंनी पुढे येऊन अधिक जबाबदारी स्वीकारण्याची ही योग्य वेळ असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com