Goa Bengaluru bus cash seizure Dainik Gomantak
गोवा

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

Goa Bengaluru bus cash seizure: मध्यरात्री पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली.

Pramod Yadav

काणकोण: चित्ताकुल्ला येथील सदाशिवगड-कारवार पोलिसांनी पणजी- बंगळूरू या खाजगी प्रवासी बसने प्रवास करीत असलेल्या एका प्रवाशाकडून एक कोटींची रोकड जप्त केली. सोमवारी मध्यरात्रीनंतर चित्ताकुला पोलिस स्थानकाचे अधिकारी प्रवाशांची तपासणी करीत होते.

पणजी-बेंगळुरु बसच्या तपासणीवेळी राजस्थानातील कल्पेश कुमार याच्या बॅगेत ही मोठी रक्कम सापडली. त्याच्या बरोबर प्रवास करणारे राजस्थान येथील ऋतब कुमार यांच्या बंगत काहींच संशायास्पद सापडले नाही. मात्र, या एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन प्रवास करत असल्याबाबतची वैध कागदपत्रे ते सादर करू न शकल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एक कोटी रुपयांएवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने ती रक्कम संबंधित संशयित हवाला व्यवहारात गुंतविण्याच्या उद्देशाने बाळगून होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काणकोण पोलिस स्थानकाचे पोलिस हरिष राऊत देसाई यांनी पणजी येथून पणजी-बंगळूरु अशा खासगी प्रवासी बसमधून प्रवास करणाया प्रवाशांकडून चित्ताकुल्ला सदाशिव गड पोलिसांनी एक कोटींची रोकड ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT