

बेळगाव: घरबसल्या अगरबत्ती बनवून पैसे कमवा, अशी जाहीरात करुन बेगळगावात तब्बल आठ हजार महिलांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूर, सोलापूर येथील असलेल्या या युवकाने दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलांनी शहापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सुरुवातीला या भामट्याने अजय पाटील असे नाव सांगितले पण, तपासात तो बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (रा. जलोळी, पंढरपूर, जिल्हा, सोलापूर) असल्याचे निष्पण्ण झाले आहे. घरबसल्या अगरबत्तीचा उद्योग करुन हजारो रुपये कमविण्याचे आमिष देऊन त्याने बेळगाव शहर आणि आसपासच्या महिलांना जाळ्यात ओढले.
शांतपणे ते त्यांची संकल्पना महिलांच्या गळी उतरवत होता. महिलांना संकल्पना पटल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्याकडून २,५०० हजार रुपयांची मागणी करत होता.
वीस दिवसांत तीन हजार पगार दिला जाईल, असे तो महिलांना पटवून देत. २,५०० रुपयांची प्रारंभिक रक्कम व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यासाठी घेत असल्याचेही तो महिलांना समजावून सांगत.
अशा पद्धतीने त्यांना आठ हजार महिलांना लक्ष्य करुन त्यांच्याकडून पैसे गोळा केले, असा आरोप करण्यात आला आहे. या भामट्याने अशापद्धतीने तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
संशयिताने महिलांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी सुरुवातीला काही महिलांना तीन हजार रुपये पगार दिल्याचे देखील उघड झाले आहे. दरम्यान, सदस्य महिलांची संख्या वाढल्यानंतर पैसे घेऊन त्यांना पोबारा केल्याचे सांगितले जाते.
सदस्य़ महिलांचा संशयित मेळावा देखील घेत होता. यासाठी तो १०० रुपये प्रत्येकी याप्रमाणे महिलांकडून हॉल भाडेही उकळायचा अशी माहिती आहे.
महिलांना घरी कच्चा माल देण्यासाठी त्याने रिक्षा देखील जोडल्या होत्या. या रिक्षा धारकांना संशयिताने भाड्याचे पैसे दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संशयित बाबासाहेब कोळेकर सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.