महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Maharashtra Karnataka border dispute: प्रलंबित सीमाप्रश्नी २०१७ मध्ये शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता याबाबत सुनावणी होणार आहे.
Karnataka Maharashtra dispute latest update
Maharashtra Karnataka border disputeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Karnataka border dispute

मुंबई: अनेक वर्षापासून भिजत पडलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महत्वाची अपडेट समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर दोन राज्यातील सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राची मागणी मान्य केली असून, मूळ दाव्यावर पुढील वर्षी २१ जानेवारी २०२६ रोजी ही सुनावणी होणार आहे.

प्रलंबित सीमाप्रश्नी २०१७ मध्ये शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता याबाबत सुनावणी होणार आहे. याप्रकरणी लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.  न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यामूर्ती आलोक कुमार आराध्ये यांनी ही विनंती मान्य केली आहे. मूळ दाव्यावरच ही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Karnataka Maharashtra dispute latest update
अग्रलेख: कोणीतरी गोव्यात येतो, स्पर्धा नियोजन करतो,त्याची संबंधित खात्यांना पुसटशीही कल्पना नसते हा 'चिंतेचा विषय'

वादातीत सीमाप्रश्न मार्गी लागावा यासाठी महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यामध्ये केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात कर्नाटक सरकारकडून देखील फेरविचार याचिका दाखल करण्यात आली. यानंतर अखेर २०१७ मध्ये याप्रकरणी शेवटची सुनावणी झाली होता. त्यानंतर आता तब्बल आठ वर्षांनी सीमाप्रश्नी सुनावणी होणार आहे.

Karnataka Maharashtra dispute latest update
पंढरपूरच्या ‘बाबा’चा बेळगावात 2 कोटींचा घपला; घरबसल्या अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली 8,000 महिलांना गंडवले

सीमाभागात मराठी भाषिकांवर कन्नडचा दबाव आणला जातो, गळचेपी केली जाते, असा वारंवार आरोप केला जातो. याबाबत हजारो आंदोलनं, मोर्चे काढण्यात आले आहेत. याबदल्यात कानडी प्रशासनाकडून जबरदस्तीचे धोरणं अवलंबल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, अशी मागणी येथील नागरिकांनी वारंवार उचलून धरली आहे.

दरम्यान, आठ वर्षानंतर सर्वोच्य न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमाभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मूळ दाव्यावर होणाऱ्या या सुनावणी कोणता युक्तीवाद होणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com