Sarsangan Cricket League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Sarsangan Cricket League: मडगाव रॉयल्‍स संघ व्हेटरन्स क्रिकेटमध्ये विजेता, अंतिम सामन्यात अंत्रुज एव्हिएटर्सवर 14 धावांनी मात

Margao Royals Veterans: सारस्‍वत स्‍पोर्टस संघ प्रतिष्‍ठानतर्फे घेण्यात आलेल्या सातव्‍या सरसांगण प्रायोरिटी व्हेटरन्‍स क्रिकेट स्‍पर्धेत अल्‍ट्रॉकाॅन मडगाव रॉयल्‍स संघाने विजेतेपद पटकावले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : सारस्‍वत स्‍पोर्टस संघ प्रतिष्‍ठानतर्फे घेण्यात आलेल्या सातव्‍या सरसांगण प्रायोरिटी व्हेटरन्‍स क्रिकेट स्‍पर्धेत अल्‍ट्रॉकाॅन मडगाव रॉयल्‍स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी अंत्रुज एव्‍हिएटर्स संघावर १४ धावांनी मात केली.

म्‍हापसा ड्रीम क्रशर्स या संघाने डिलाईट टायटन्‍स या संघावर ६ गडी राखून विजय नोंदवून तिसरे स्‍थान पटकावले. सामने आर्लेम क्रिकेट मैदानावर झाले. युवा उद्योजक चिराग नायक यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

संदीप दलाल (अंतिम सामन्याचा मानकरी), रसिक पै खोत (उत्कृष्ट फलंदाज), महेश चुरी (उत्कृष्ट गोलंदाज) यांना अंतिम सामन्यात, तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत भूषणे पै वेर्णेकर (सामन्याचा मानकरी), विभम पै (फलंदाज), सिद्धेश बोडके (गोलंदाज) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

राकेश मल्ल्या (स्पर्धेचा मानकरी, २३० धावा, ८ विकेट), अविनाश कोसंबे (फलंदाज, २६० धावा), रसिक पै खोत (गोलंदाज, १० विकेट), महेंद्र पै कुचेलकर (यष्टिरक्षक, १५ बळी), संदीप दलाल (क्षेत्ररक्षक, ६ झेल), ६३ वर्षीय यतीन कैसरे (खास पुरस्कार, १४१ धावा, ९ विकेट) हे खेळाडू स्पर्धेत सर्वोत्तम ठरले.

संक्षिप्‍त धावफलक : अंतिम सामना ः मडगाव रॉयल्‍स : २० षटकांत ९ बाद १३८ (यतीन कैसरे नाबाद ३१, दीप भेंडे २७, संदीप दलाल २४, सर्वेेश कामत, रसिक पै खोत, सुदिन कामत व योगेश नायक प्रत्‍येकी दोन विकेट) वि. वि. अंत्रुज एव्‍हीएटर्स ः २० षटकात ६ बाद १२४ (रसिक पै खोत ३५, सुदिन कामत ३२, अनुप बोरकर २७, महेश चुरी व संदीप दलाल प्रत्‍येकी २ बळी)

तिसऱ्या क्रमांकाची लढत ः डिलाईट टायटन्‍स ६ बाद १३७ (सिद्धेश देसाई ३५, शिराज पै खोत ३५, आशुतोष पै आंगले २६, भूषण पै वेर्णेकर ३ बळी) पराभूत वि. म्‍हापसा ड्रीम क्रशर्स ः १४.३ षटकात ४ बाद १३९ (विभव पै ३७, अविनाश कोसंबे ३५, सिद्धेश बोडके २ बळी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT