Super Cup, FC Goa Vs Jamshedpur FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Super Cup: FC Goa इतिहास घडवणार का? सुपर कपसाठी जमशेदपूरविरुद्ध लढत; एकाच सामन्यात 2 पराक्रम करण्याची संधी

FC Goa Vs Jamshedpur FC: जमशेदपूर एफसीने सुपर कप जिंकल्यास कारकिर्दीतील त्यांचा तो पहिला करंडक ठरेल. या स्पर्धेत त्यांनी यापूर्वी दोन वेळा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

Sameer Panditrao

पणजी: एफसी गोवाने शनिवारी रात्री ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सुपर कप पटकावल्यास त्यांना दुहेरी संधी साधता येईल. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला २०२५-२६ मधील एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पात्रता मिळेल, तसेच या स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद पटकावणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळेल.

अंतिम लढतीत एफसी गोवासमोर खडतर आणि धोकादायक आव्हान आहे. २०२४-२५ मधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन्ही लढतीत खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने एफसी गोवास नमविले होते. जमशेदपूर एफसीने सुपर कप जिंकल्यास कारकिर्दीतील त्यांचा तो पहिला करंडक ठरेल. या स्पर्धेत त्यांनी यापूर्वी दोन वेळा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

एफसी गोवाने ही स्पर्धा सहा वर्षांपूर्वी सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकली होती. यंदा आयएसएल लीग शिल्डच्या शर्यतीत एफसी गोवा संघ उपविजेता ठरला, तर कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांचे, तसेच जमशेदपूर एफसीचे आव्हान संपुष्टात आले होते.

"आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण आम्हाला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरणे शक्य होईल. साहजिकच आम्ही सर्वोत्तम खेळासाठी प्रयत्नशील राहू,’’ असे जमशेदपूर एफसीचे मार्गदर्शक जमील यांनी शुक्रवारी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. २०२३ मध्ये त्यांना एएफसी चँपियन्स लीगच्या पात्रतेच्या प्ले-ऑफ लढतीत पराभूत व्हावे लागले होते. यंदा दोन्ही लढतीत जमशेदपूरने एफसी गोवावर विजय नोंदविला असला, तरी शनिवारचा सामना पूर्णतः वेगळा असून भक्कम खेळ करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी तांत्रिकदृष्ट्या खूप मजबूत आहे, असे मत जमील यांनी व्यक्त केले.

Manolo Marquez

मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीने २०२१-२२ मध्ये आयएसएल कप जिंकला होता, त्यानंतर प्रथमच त्यांच्या मार्गदर्शनाखालील संघ अंतिम लढतीत खेळत आहे. आशियाई स्पर्धेसाठी तेही उत्सुक आहेत. मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळते, तेव्हा अर्थातच तुम्हाला खूपच प्रेरित व्हावे लागते. एफसी गोवा चार वर्षांपूर्वी चँपियन्स लीगमध्ये खेळला आहे. जमशेदपूर संघ कधीच खेळलेला नाही, तरीही दोन्ही संघ इच्छुक आहेत." एफसी गोवा संघाने २०२१ मध्ये एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला होता.

एफसी गोवा विरुद्ध जमशेदपूर एफसी

सुपर कपमध्ये ४ लढतीत एफसी गोवाचे ३, तर जमशेदपूर एफसीचा १ विजय

एफसी गोवा २०१८ मध्ये ५-१ फरकाने, तर २०१९ मध्ये ४-३ फरकाने विजयी; जमशेदपूरचा २०२३ मध्ये ५-३ असा विजय

२०२४-२५ आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाविरुद्ध जमशेदपूर एफसीचे २ विजय; फातोर्डा येथे २-१, तर जमशेदपूर येथे ३-१ फरकाने बाजी

एफसी गोवा सुपर कपमध्ये दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, २०१९ मध्ये विजेते; जमशेदपूर एफसीची पहिलीच अंतिम लढत

यंदाच्या सुपर कप स्पर्धेत

एफसी गोवा ः वि. वि. गोकुळम केरळ ३-०, वि. वि. पंजाब एफसी २-१, वि. वि. मोहन बागान ३-१

जमशेदपूर एफसी ः वि. वि. हैदराबाद एफसी २-०, बरोबरी वि. नॉर्थईस्ट युनायटेड ०-० (पेनल्टींवर विजयी ५-४), वि. वि. मुंबई सिटी १-०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

SCROLL FOR NEXT