Pro League Goa: स्पोर्टिंग क्लब द गोवाने राखले प्रो-लीग विजेतेपद! सर्वाधिक 46 गुण, धेंपो क्लबला उपविजेतेपद

Sporting Club de Goa: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने अखेरच्या साखळी लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
Sporting Club de Goa, Pro League Goa
Pro League Goa WinnerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने अखेरच्या साखळी लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांदा विजेते ठरलेल्या स्पोर्टिंग गोवाचे सर्वाधिक ४६ गुण झाले, तर ४५ गुणांमुळे धेंपो क्लबला उपविजेतेपद मिळाले.

एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर झालेल्या सुपर लीग फेरीतील लढतीत शुक्रवारी स्पोर्टिंग क्लबला बरोबरीचा एक गुण पुरेसा होता, धेंपो क्लबला विजयाच्या पूर्ण तीन गुणांची अत्यावश्यकता होती.

स्पर्धेत शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर क्लब द साळगावकरने जीनो स्पोर्टस क्लबला २-० फरकाने हरविले. साईश हळर्णकर याने ६८व्या, तर इसाक झोमुआनपुईया याने ८०व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

Sporting Club de Goa, Pro League Goa
I League Trophy: चर्चिल ब्रदर्सकडून आय-लीग ट्रॉफी परत मागितली, AIFF चा आदेश; करंडक दिल्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित

क्लब साळगावकरला ४१ गुणांसह तिसरा, तर जीनो क्लबला ३६ गुणांसह चौथा क्रमांक मिळाला. शिरसई येथील मैदानावर एफसी गोवाने सेझा फुटबॉल अकादमीस २-० फरकाने नमविले. दोन्ही गोल इंज्युरी टाईम खेळात झाले. माल्सॉम्त्लुआंगा याने ९०+६ व्या, तर लाल्थांगलियाना याने ९०+७ व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. एफसी गोवास ३५ गुणांसह पाचवा, तर सेझा अकादमीस ३३ गुणांसह सहावा क्रमांक मिळाला.

Sporting Club de Goa, Pro League Goa
Super Cup 2025: महामुकाबला! FC Goa भिडणार धोकादायक मोहन बागानशी; उपांत्य फेरीतील महत्त्वपूर्ण लढत

प्रो-लीग अंतिम क्रमवारी (कंसात गुण)

स्पोर्टिंग क्लब द गोवा (४६), धेंपो स्पोर्टस क्लब (४५), क्लब द साळगावकर (४१), जीनो एफसी (३६), एफसी गोवा (३५), सेझा फुटबॉल अकादमी (३३), कुठ्ठाळी व्हिलेजर्स (२६), गोवा पोलिस (२०).

‘‘(आय-लीग २ स्पर्धेत) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे आम्ही आय लीगसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलो. मात्र, गेल्या वर्षापेक्षा आमचे स्थान चांगले राहिले, यावरून आमच्या प्रगतीचे दर्शन घडते. आम्ही एक चळवळ उभारत आहोत. दोन वर्षांतील हे दुसरे विजेतेपद या प्रवासातील पुढचे पान आहे. पुढील मोसमात आम्ही आणखी चांगले प्रदर्शन करू. मला पूर्ण खात्री आहे की संघ सलग तिसरे विजेतेपद मिळवण्यासाठी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आय लीग पात्रतेसाठी पूर्ण ताकदीनिशी मेहनत करेल.’’

नतालिना वाझ, स्पोर्टिंग क्लब द गोवाच्या अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com