पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एलिट ब गटात गोव्याचे दोन सामने असून महाराष्ट्र व केरळविरुद्धच्या लढती खडतर ठरण्याचे संकेत असून बाकी मोहीम खडतर ठरण्याचे संकेत आहेत.
गोव्याचा महाराष्ट्राविरुद्धचा सामना २२ जानेवारीपासून पुण्यात, केरळविरुद्धची लढत २९ जानेवारीपासून पर्वरी येथे खेळली जाईल. एलिट ब गटात गोव्याचा संघ सध्या पाच लढतीनंतर ११ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. बाद फेरी गाठण्याची त्यांची शक्यता फारच अंधूक आहे.
एलिट ब गटात सध्या कर्नाटक २१ गुणांसह अव्वल आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे १८, मध्य प्रदेशचे १६, तर सौराष्ट्राचे १३ गुण झाले आहेत. गोव्यानंतर क्रम असलेल्या पंजाबचे ११, केरळचे आठ, तर चंडीगडचा फक्त एक गुण आहे.
महाराष्ट्राचा संघ बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत असल्यामुळे ते गोव्याविरुद्ध पूर्ण गुणांच्या उद्देशानेच मैदानात उतरतील हे स्पष्ट आहे. महाराष्ट्राविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत गोवा तीन सामने खेळला आहे, पण विजय नोंदविता आलेला नाही. महाराष्ट्राने एका लढतीत विजय मिळविला असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
सातत्य राखण्यात अपयशी
गोव्याचा अखेरचा रणजी सामना नोव्हेंबरमध्ये झाला. त्यानंतर व्हाईट बॉल क्रिकेटमधील दोन्ही प्रकारात अपेक्षा उंचावूनही गोव्याचा संघ बाद फेरीपासून दूर राहिला. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटात चार विजय व तीन पराभवांसह १६ गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला.
अखेरच्या लढतीत महाराष्ट्राविरुद्ध पराभव पत्करला आणि बाद फेरी हुकली. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याने सलग तीन सामने जिंकले, पण नंतर ओळीने चार सामने गमावल्यामुळे आठ संघांत १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर घसरण झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.