Jay Gupta FC Goa Football  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Jay Gupta: जय गुप्तासाठी FC Goa ला मिळाली 'विक्रमी' रक्कम! बदल करारांतर्गत खेळणार ईस्ट बंगालकडून

Jay Gupta Transfer: मागील दोन मोसमात उल्लेखनीय ठरलेला तरुण बचावपटू जय गुप्ता याच्या संघ बदल प्रक्रियेमुळे एफसी गोवास मोठा मोबदला मिळाला. आगामी कारकिर्दीत तो कोलकात्यातील ईस्ट बंगाल संघातून खेळेल.

Sameer Panditrao

पणजी: मागील दोन मोसमात उल्लेखनीय ठरलेला तरुण बचावपटू जय गुप्ता याच्या संघ बदल प्रक्रियेमुळे एफसी गोवास मोठा मोबदला मिळाला. आगामी कारकिर्दीत तो कोलकात्यातील ईस्ट बंगाल संघातून खेळेल.

एफसी गोवाने मंगळवारी सोशल मीडियाद्वारे जय गुप्ताला करारमुक्त केल्याचे जाहीर केले. त्याचवेळी खेळाडू संघ बदल करारांतर्गत भारतीय खेळाडूसाठी मोजलेली क्लब पातळीवरील ही विक्रमी रक्कम असल्याचे एफसी गोवाने नमूद केले. नेमकी रक्कम उघड करण्यात आलेली नाही.

जय गुप्ता २३ वर्षांचा आहे. २०२३-२४ व २०२४-२५ असे दोन मोसम तो एफसी गोवा संघातर्फे खेळला. दोन्ही मोसमात एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तो संघात असताना २०२५ मध्ये संघाने सुपर कपही जिंकला.

एफसी गोवातर्फे जय एकूण ४२ सामने खेळला. एकंदरीत दहा सामन्यांत क्लीन शीट राखली. त्याने दोन गोल व तीन असिस्टचेही योगदान दिले. २०२३-२४ मध्ये २५ सामने खेळला, नऊ क्लीन शीटसह त्याने दोन गोलही नोंदविले होते. गतमोसमात तो १७ सामने खेळला.जय गुप्ताला पुढील वाटचालीसाठी एफसी गोवाने शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस महाशुभयोगाचा! 'या' 5 भाग्यवान राशींवर राहणार बजरंगबलीची कृपादृष्टी, धनालाभासह मिळणार नशिबाचीही साथ

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

SCROLL FOR NEXT