
पणजी: सुपर कप विजेत्या एफसी गोवाने गतमोसमातील कर्णधार ओडेई ओनेइंडिया याला निरोप दिला. हुकमी ३५ वर्षीय स्पॅनिश बचावपटूने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग दोन मोसम गोव्यातील संघाचे प्रतिनिधित्व केले.
ओडेई ओनाइंडिया जुलै २०२३ मध्ये एफसी गोवा संघात दाखल झाला. तो संघात असताना मागील दोन मोसमात एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठली, तसेच गतमोसमात सुपर कपही जिंकला.
आयएसएल स्पर्धेत २०२३-२४ मोसमात ओडेई २४ सामने खेळला. त्याने ८ सामन्यांत क्लीन शीट राखताना, एक गोलही नोंदविला. २०२४-२५ मोसमात २५ सामन्यांत तो खेळला आणि ७ क्लीन शीट्सची नोंद केली. हैदराबाद एफसीतर्फे २०२०-२१ व २०२२-२३ मध्ये ओडेई आयएसएल स्पर्धेत खेळला. एकंदरीत आयएसएल स्पर्धेत तो ९० सामने खेळला. त्याने ३५ क्लीन शीट्स, २ गोल व एका असिस्टची नोंद केली.
एफसी गोवाने ओडेईला निरोप देताना गुरुवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले, की ‘‘आमच्या लोगोप्रती आमच्या कर्णधाराने प्रत्येक क्षणी, प्रत्येक टॅकलमध्ये, घामाच्या प्रत्येक थेंबात आपली निष्ठा दाखवली. त्याने ऑरेंज जर्सी अभिमानाने परिधान केली, मनापासून खेळला आणि आम्हाला विजेतेपदापर्यंत नेले. या दोन अविस्मरणीय वर्षांत त्याने आम्हाला दाखवून दिले, की ‘गौर’ होणे म्हणजे नेमके काय – मैदानावर आणि मैदानाबाहेरही. धन्यवाद, ओडेई. तुझ्या पुढील प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा. एकदा गौर झालात की, सदैव गौर!’’
२०२०-२१ व २०२२-२३ ः हैदराबाद एफसी
२०२३-२४ व २०२४-२५ ः एफसी गोवा
एफसी गोवातर्फे ः ४९ सामने, १५ क्लीन शीट्स, १ गोल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.