Goa Sports Director Transfer Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Sports Director Transfer: क्रीडामंत्री तवडकर आणि संचालक गावडे यांच्यातील संघर्ष विकोपाला; बदलीच्या हालचाली सुरू?

Goa Sports Department: गोवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची माहिती गावडे यांनी क्रीडामंत्र्यांना न दिल्याने दोघांमधील मतभेदांना सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्याच्या क्रीडा खात्यात क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि क्रीडा संचालक तथा गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांच्यातील मतभेद आता विकोपाला पोहोचले आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गावडे यांची येत्या आठवडाभरात अन्य पदावर बदली होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

गोवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची माहिती गावडे यांनी क्रीडामंत्र्यांना न दिल्याने दोघांमधील मतभेदांना सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धांची माहिती देण्यासाठी गावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली; मात्र त्याची कल्पना क्रीडामंत्री तवडकर यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे पत्रकारांसमोर या स्पर्धांबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगण्याची वेळ तवडकर यांच्यावर आली होती. या प्रकारानंतर तवडकर यांनी क्रीडा खात्यात गावडे नकोत, अशी भूमिका घेतल्याचे समजते.

या वादाला गोमंतक गौड मराठा समाज संस्थेतील घडामोडींचीही किनार असल्याची चर्चा आहे. या संस्थेवर सरकारने गावडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. तवडकर यांनी गावडे यांच्या बदलीचा आग्रह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे धरल्याचे समजते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या बदलीसंदर्भात कार्मिक खात्याला निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, गावडे यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जाते. त्यामुळे त्यांची बदली झाल्यास त्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

कामकाजावरही मतभेदांचा परिणाम

गावडे सध्या क्रीडा संचालक आणि ‘साग’चे कार्यकारी संचालक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, खात्याच्या कामकाजावरून मंत्री आणि संचालक यांच्यात मतभेद वाढल्याची चर्चा आहे. या मतभेदांचा प्रशासकीय कामकाजावरही परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावडे यांना अन्य पदावर नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! सामन्यादरम्यान टीम इंडियात मोठा बदल; कारण काय?

IFFI 2026 Golden Peacock Award Winner: स्पेनच्या 'आक्वी'ला सुवर्णमयूर; 'रहमा'ला गांधी पुरस्कार, 'कांतारा'चीही पुरस्कारांवर मोहोर

Afghanistan School Blast: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील शाळेत भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 100 जखमी

Lucky Zodiac Signs: सुख-समृद्धीचे दार उघडणार! डिसेंबरमध्ये गुरु-शनीच्या चालीत बदल; 'या' 3 राशींची होणार भरभराट

Jharkhand Accident: झारखंडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, वाहनाच्या भीषण धडकेत 13 जणांचा मृत्यू; बिहारच्या नालंदावर शोककळा!

SCROLL FOR NEXT