Goa Rotary Rain Run  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Rain Run : अंकित, दीपिका २१ किलोमीटरमध्ये अव्वल, २५ पॅरा ॲथलीट्सचा सहभाग

Goa Rotary Rain Run: मुख्य शर्यतीत नौदलाचा अंकितकुमार यादव आणि बंगळूरची दीपिका प्रकाश यांची धाव अव्वल ठरली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘रोटरी रेन रन’मधील २१ किलोमीटर मुख्य शर्यतीत नौदलाचा अंकितकुमार यादव आणि बंगळूरची दीपिका प्रकाश यांची धाव अव्वल ठरली. स्पर्धेत गोवा आणि कर्नाटकातील मिळून सुमारे २५ पॅरा ॲथलीट्सचा उत्साहही वाखाणण्याजोगा ठरला.

रेन रनचे यंदा दहावे वर्ष होते. या उपक्रमातून उभा झालेला निधी ‘प्रकाश कर्करोग मदत’ प्रकल्पास देण्यात आला. महिला आरोग्य व शिक्षणाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्पर्धेत देश-विदेशातील मिळून दोन हजारापेक्षा जास्त धावपटूंनी भाग घेतला.

पर्वरी रोटरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या या शर्यतीच्या प्रारंभ बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर २ एसटीसीचे उप कमांडंट कर्नल राजीव राघवन यांच्या हस्ते झाला.

पुरुषांच्या २१ किलोमीटर शर्यतीत प्रेम कुमार याने दुसरा, तर जपानच्या रिओहेई ताकाहाशी याने तिसरा क्रमांक मिळविला. महिलांत रशियाची गालिना कुझ्मिना हिने दुसरा, तर फ्रान्सच्या हान्सिन बेनोई हिने तिसरा क्रमांक प्राप्त केला. १८ ते ४४ वर्षे वयोगटात १० किलोमीटर शर्यतीत धारबांदोड्याचा हरी वेळीप पुरुषांत, तर मडगावची अयान सुवारिस महिलांत प्रथम स्थानी राहिली.

२१ किलोमीटर विजेत्या अंकित याने एक तास, २० मिनिटे आणि ३१ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. ३६ वर्षीय दीपिका हिने एक तास, ४३ मिनिटे व पाच सेकंद वेळ नोंदविला. १० किलोमीटर शर्यतीत हरी याने ३८ मिनिटे व ५७ सेकंद, तर महिलांत अयान हिने ५२ मिनिटे व ११ सेकंद वेळ नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

SCROLL FOR NEXT